Agricultural Loan : शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता मिस्ड कॉल किंवा SMS करून कृषी कर्ज देण्याची सोय पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) केली आहे. यासंबंधी बँकेने ट्विट करत संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच कृषी कर्जासाठी अर्ज कसा करायचा? यासंबंधित सर्व माहिती तुम्हला या ट्विट मध्ये मिळेल
Agricultural Loan : अर्ज कसा करायचा?
पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) म्हटलं आहे कि देशातील शेतकरी अतिशय सोप्या आणि माफक अटींवर अर्ज करून शेतीसाठी कर्ज मिळवू शकतात.
हेही वाचा : भारत सरकार ‘या’ कंपनीमध्ये भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
SMS द्वारे अर्ज –
अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना 56070 या नंबरवर Loan लिहून SMS करायचा आहे. त्यानंतर लगेच बँकेकडून या कर्जाबद्दल माहिती देण्यात येईल. बँकेने दिलेल्या म्हणीनुसार तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
मिस्ड कॉल द्वारे अर्ज –
शेतकऱ्यांना 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन कर्जासाठी अर्ज करता येणार आहे.
नेटबँकिंगद्वारे देखील करता येणार अर्ज –
शेतकरी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नेटबँकिंगद्वारे देखील कृषी कर्जासाठी अर्ज करू शकतात.
दरम्यान सरकारच्या शेतकऱ्यांसाठी कोण-कोणत्या योजना आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला https://pmksy.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर मिळेल.