Sunday , 13 October 2024
Home FinGnyan Bank Holidays In November 2023 : नोव्हेंबरमध्ये तब्बल अर्धा महिना बँकांना असणार सुट्टी. जाणून घ्या बँकांच्या सुट्यांचं वेळापत्रक
FinGnyanFinNews

Bank Holidays In November 2023 : नोव्हेंबरमध्ये तब्बल अर्धा महिना बँकांना असणार सुट्टी. जाणून घ्या बँकांच्या सुट्यांचं वेळापत्रक

Bank Holidays In November 2023
Bank Holidays In November 2023

Bank Holidays In November 2023 : ऑक्टोबर महिना संपायला आवघी एक दिवस शिल्लक राहिला आहे.

बँकांशी निगडित काही कामे असतील तर लवकर करून घ्या कारण नोव्हेंबर 2023 महिन्यामध्ये बँकांना तब्बल 15 दिवस सुट्टी असणार आहे.

म्हणजे जवळपास आर्धा महिना बँक (Bank) बंद असणार आहे. नोव्हेंबर महिना सणासुदीचा असल्यामुळे बँकांना जास्त दिवस सुट्टी आहे. बँका कोणकोणत्या दिवशी बंद असणार? जाणून घेऊयात…

Bank Holidays In November 2023 : बँकांना 15 दिवस सुट्ट्या

यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये दिवाळी, पाडव्यासारखे महत्वाचे सण आहेत.

त्यामुळे सुट्यांच्या संख्यांमध्ये वाढ झाली आहे. बँकांच्या प्रत्येक ग्राहकाला बँकेच्या कामकाजाचे वेळेत नियोजन करता यावे ह्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वर्ष सुरु होण्याआधीच महिन्यांप्रमाणे बँकांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करत असते.

ह्या सुट्ट्या राज्य किंवा स्थानिक सणानुसार वेगवेगळ्या असू शकतात.

नोव्हेंबर महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका बंद असणार आहेत? जाणून घेऊयात नोव्हेंबर 2023 महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी.

List Of Bank Holidays In November 2023 : नोव्हेंबर 2023 महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका असणार बंद?

1 नोव्हेंबर 2023 – ह्या दिवशी कन्नड राजोत्सव दिवस, कटू आणि करवा चौथ आहे. त्यामुळे या दिवशी बंगळुरू, इन्फाळ आणि शिमला येथील बँकांना सुट्टी असणार आहे.

5 नोव्हेंबर 2023 – रविवार निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

10 नोव्हेंबर 2023 – वंगाळा सणानिमित्त शिलाँग आणि मेघालायमधील बँकांना सुट्टी असणार आहे.

11 नोव्हेंबर 2023 – महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

12 नोव्हेंबर 2023 – रविवार निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

13 नोव्हेंबर 2023 – गोवर्धन पूजा, लक्ष्मी पूजन, दिवाळीनिमित्त ह्या दिवशी महाराष्ट्रासह त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथील बँकांना सुट्टी असणार आहे.

14 नोव्हेंबर 2023 – बली प्रतिपदा विक्रम संवत नवीन वर्ष निमित्त गुजरात, महाराष्ट्र कर्नाटक आणि सिक्कीम येथील राज्यातील बँकांना सुटीच्या असणार आहे.

15 नोव्हेंबर 2023 – भाऊबीज, चित्रगुप्त जयंती, निंगल चक्कूबा आणि भ्रात्री द्वितीयेनिमित्त सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आणि पश्चिम बंगाल मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

19 नोव्हेंबर 2023 – रविवार निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

20 नोव्हेंबर 2023 – छठपूजेनिमित्त बिहार, झारखंड आणि राजस्थान मधील काही शहरांमधील बँकांना सुट्टी असणार आहे.

23 नोव्हेंबर 2023 – सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल हा सण असल्यामुळे उत्तराखंड आणि सिक्कीम मधील बँकांना सुट्टी असणार आहे.

25 नोव्हेंबर 2023 – महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असणार आहे.

26 नोव्हेंबर 2023 – रविवार निमित्त बँकांना सुट्टी असणार आहे.

27 नोव्हेंबर 2023 – गुरु नानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेमुळे त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, नवी दिल्ली, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील बँकांना ह्या दिवशी सुटीच्या असणार आहे.

30 नोव्हेंबर 2023 – कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरू कर्नाटक मधील बँकांना सुटीच्या असणार आहे.

सुट्ट्यांच्या काळात बँकांची कामे कशी करायची?

बँक म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

त्यामुळे बँकांना दीर्घकाळ सुट्टी असल्यावर सर्वांच्या आर्थिक बाबींवर परिणाम होऊ शकतो.

अशा काळामध्ये तुम्ही नेट बँकिंग (Net Banking), मोबाईल बँकिंग (Mobile Banking) किंवा UPI च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करू शकता.

ह्यासोबतच पैसे काढण्यासाठी तुमच्याकडे ATM सारखा पर्याय देखील उपलब्ध आहे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज – शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा प्रवास.

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज - शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा...