Monday , 4 November 2024
Home Startups Hypothalamus : Healthy meal delivery service : पेशंट हीच गिऱ्हाईकं
Startups

Hypothalamus : Healthy meal delivery service : पेशंट हीच गिऱ्हाईकं

Hypothalamus : Healthy meal delivery service :
Hypothalamus : Healthy meal delivery service :

Hypothalamus : Healthy meal delivery service : हॉटेल, रेस्टोरंट ह्याचसोबत काळाच्या ओघात गरज म्हणून घरगुती मेस, नंतर टिफिन पुरवणारे सुरु झाले.

गेल्या काही यावर्षात पोळी भाजी केंद्रांनी पण चांगलाच जोर पकडला आहे. हॉटेलपेक्षा घरगुती खाण्याकडे लोकांना कल दिसतो.

आता तर अनेक आजार असे आहेत की ज्यात घरचे खाणे जास्त महत्वाचे मानले जाते.

डायट हा शब्द फॅड म्हणून सुरुवातीला अनेक वर्ष वापरला गेला. कधी त्याची चेष्टा सुद्धा झाली. पण खरंतर डाएट म्हणजे पथ्य.

आणि पथ्य हीच आयडिया घेऊन मुंबईत साधारण वर्षभरापूर्वी B2C प्रकारातला एक बिझनेस सुरु झाला.

Hypothalamus : Healthy meal delivery service :

23 वर्षीय श्रीहर्षा ह्याने शरथचंद्र आणि निराली ह्यांच्या सोबतीने फूड आणि हेल्थ सेक्टर ह्याचे कॉम्बिनेशन करून ‘हायपोथालेमस’ची (Hypothalamus) सह-स्थापना केली.

गेल्या वर्षी सुरु झालेला हा स्टार्टअप सर्वांगीण पोषणावर लक्ष केंद्रित करून सामान्य आरोग्य भोजन सेवा आणि रोग-विशिष्ट आहार असलेले जेवण पुरवते.

मधुमेह, कर्करोग, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, थायरॉईड, PCOS आणि यकृताच्या आजारांसह विविध आजार असलेल्या रुग्णांना या सुविधेद्वारे सेवा दिली जाते.

कम्पनीच्या बोर्डवर न्यूट्रिशनिस्ट, डॉक्टर्स आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली Meal Design करून सर्व्हिस दिली जाते.

रुग्णाच्या गरजेनुसार आणि रुग्णाच्या पथ्यानुसार त्याला जेवण पुरवले जाते.

आयडिया बघायला गेलं तर साधीच पण मुंबईसोबत आता ती नवी मुंबई आणि बंगलोर मध्ये पण जोर धरू लागली आहे.

पहिल्या सहा महिन्यातच 35 लाखाचा टर्नओव्हर त्यांनी केला. असं म्हणतात की तुम्ही काय व्यवसाय करता ह्यापेक्षा तो कश्याप्रकारे करता ह्यावर बिझनेस उभा राहतो.

Related Articles

My Mandi Startup : भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी..

My Mandi Startup : भाजी आपल्या सोयीच्या वेळेत घरी डिलिव्हर व्हावी, ती...

Butt Baby Carrier : आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याचा अनोखा स्टार्टअप

Butt Baby Carrier : आकाश आणि रुचीला असं लक्षात आलं की भारतातले...

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज – शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा प्रवास.

The History Of Reliance Industry : रिलायन्स इंडस्ट्रीज - शुन्यापासून ते वर्चस्वापर्यंतचा...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...