Friday , 12 April 2024
Home Investment Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप
InvestmentStartups

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup
Farm Didi Food Tech Startup

Farm Didi Food Tech Startup : ताई माई अक्का मिळून विचार केला पक्का, बेरोजगारीचा आणि गरिबीला मारू बुक्का.

‘ताई, आम्ही अजून काय करू शकतो ग…?’

बिहारमध्ये काम करणाऱ्या महिला कधीकाळी आपल्या शैक्षणिक प्रोजेक्टसाठी बिहारमध्ये फिरत असताना मंजरी शर्माला (Manjari Sharma) विचारत होत्या.

Farm Didi Food Tech Startup : मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप सुरु

मंजरी शर्मा या IIM कलकत्ता या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहे.

बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी ‘फार्म दीदी’ हा फूड-टेक स्टार्टअप (Food Tech Startup) सुरु केला.

एक दशलक्ष ग्रामीण महिलांना रोजगार मिळवून देणे हा उद्देश त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवला आहे.

महाराष्ट्रात फिरताना त्यांना असे लक्षात आले की, काही ठिकाणी आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण महिला उत्पादकांना ब्रॅण्डिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग ह्याबद्दल फारशी काही माहिती नाही.

महाराष्ट्रातल्या महिला फूड बिझनेसबद्दल जास्त उत्साही दिसल्या. त्यानंतर या महिलांसोबत काम करून त्यांनी प्रगती केली.

Farm Didi Food Tech Startup : 2021 मध्ये App लाँच

2021 साली Didi नावाने एक App लाँच करून त्यावर काम सुरु केले.

जवळपास 100 बचत गटांना जोडून घेऊन त्यांच्या उत्पादनाच्या क्वालिटीवर आणि हायजिनवर काम करणे सुरु केले.

फार्म दीदी आज महाराष्ट्रातील कोल्हापूर, रायगड, छ.संभाजीनगर ह्या भागात आपले जाळे विस्तारून आहे.

लवकरच इतर जिल्ह्यात आपलं नेटवर्क वाढवून किमान 100 नवीन बचतगटांशी जोडण्याचा प्रयत्न फार्म दीदी करत आहे.

Products of Farm Didi : फार्म दीदी उत्पादने –

विविध प्रकारची लोणची, वेगवेगळ्या चटण्या, नैसर्गिक मध, लाडू, पापड अश्या अनेक घरगुती चवीच्या उत्पादनांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिला आहे.

मंजरी शर्मा सांगतात की प्रॉफिट मिळवणारा सोशल उपक्रम म्हणजे आमचा फार्म दीदी ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप (Farm Didi) आहे.

आमच्यासोबत काम करणार्‍या उद्योजक दीदींना सातत्याने प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करणे हा मुख्य हेतू आहे.

त्याचसोबत कमावलेल्या रकमेपैकी मोठा भाग पुन्हा व्यवसायांत गुंतवून प्रॉफिट वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो.

उद्योजक (Entrepreneur) मंजिरी शर्मा (Manjari Sharma) यांची उत्पादने साधी नेहमीचीच पण बिझनेस आयडिया जरा वेगळी होती. त्यामुळे त्यांचा हा स्टार्ट अप व्यवसाय मोठ्या उंचीवर जाऊन पोहचला आहे.

Related Articles

My Mandi Startup : भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी..

My Mandi Startup : भाजी आपल्या सोयीच्या वेळेत घरी डिलिव्हर व्हावी, ती...

Butt Baby Carrier : आकाश आणि रुची ह्या दाम्पत्याचा अनोखा स्टार्टअप

Butt Baby Carrier : आकाश आणि रुचीला असं लक्षात आलं की भारतातले...

Hypothalamus : Healthy meal delivery service : पेशंट हीच गिऱ्हाईकं

Hypothalamus : Healthy meal delivery service : डाएट हीच आयडिया घेऊन मुंबईत...

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...