Saturday , 27 July 2024
Home Investment How to Get Amul Franchise : ‘अमूल’सोबत व्यवसाय करून कमावू शकता चांगला नफा.
Investment

How to Get Amul Franchise : ‘अमूल’सोबत व्यवसाय करून कमावू शकता चांगला नफा.

How to Get Amul Franchise
How to Get Amul Franchise : Finntalk

How to Get Amul Franchise : सध्याची तरुणाई नोकरीपेक्षा व्यवसायाच्या प्रेमात पडत आहे.

दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा एखादा व्यवसाय उभा करून त्यात अहोरात्र कष्ट करून व्यवसायाला एक नवी भरारी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

खरं तर आत्ताची तरुणाई असे स्वप्न पाहत आहे हीच खूप अभिमानाची बाब आहे.

पण कधी कधी काही तरुण व्यवसायाची व मार्केटची संपूर्ण माहिती न काढता व्यवसाय टाकून देतात.

अशावेळी त्यांच्या पदरी निराशा येऊ शकते. त्यामुळे त्या व्यवसायाचे संपूर्ण ज्ञान घेऊन संशोधन करून व्यवसाय सुरु केला पाहिजे.

म्हणजेच अशा व्यवसायाची सुरुवात केली पाहिजे जिथे गुंतवणूक खर्च कमी आणि बाराही महिने त्याला मागणी असली पाहिजे.

डेअरी हा एक असा व्यवसाय आहे कि ज्याच्या उत्पादनांना वर्षातील बाराही महिने मागणी असते.

हेही वाचा : अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे? या योजनेअंतर्गत लाभधारकांना किती रुपये मिळतात? जाणून घ्या.

दूध (Milk), दही (Curd), लस्सी (Lassi), आईस्क्रीम (Ice Cream), पनीर (paneer), चीज (Cheese), यांसारख्या अनेक उत्पदनांना बाराही महिने बाजारात प्रचंड मागणी असते. त्यामुळे तुम्ही डेअरी उत्पादनांचा व्यवसाय सुरु करून लाखोंची कमाई करू शकता.

हा व्यवसाय कसा सुरु करायचा याचा जास्त विचार करण्याची गरज नाहीये कारण देशातील नामांकित डेअरी कंपनी अमूलने (Amul) एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. अमूल ही कंपनी फ्रँचायझी देत आहेत.

तुम्हीदेखील या अमूलची फ्रँचायझी विकत घेऊन चांगली कमाई करू शकता. जाणून घेण्यात याबाबतची संपूर्ण माहिती..

How to Get Amul Franchise : अमूल फ्रँचायझी विकत घेण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

कमीत-कमी गुंतवणूक करून तुम्ही अमूलची फ्रँचाइजी (AMUL Franchise) विकत घेऊ शकता.

मूलची फ्रँचाइजी विकत घेण्यासाठी तुम्हाला किमान 2 ते 5 लाख रुपये गुंतवावे लागतील.

यासाठी प्रथम तुम्हाला अमूलच्या आउटलेटसाठी चांगली जसग शोधावी लागेल. जागा अशी शोधा जिथे ग्राहकांची नेहमी वर्दळ असेल आणि सर्वाना शॉप नजरेस पडेल.

तुम्ही शोधलेली जागा ही 100 चौरस फूट इतकी मोठी असावी. यानंतर तुम्हाला 25,000 रुपये सिक्युरिटी मनी म्हणून भरावे लागतील.

एवढं झाल्यावर तुम्हाला उत्पादनासाठी पैसे द्यावी लागतील. त्यानंतर दुकानाचा लुक AMUL सारख करण्यासाठी आणि सजावटीसाठी काही रक्कम खर्च करावी लागू शकते.

किती कमाई होऊ शकते?

अमूल आपल्या फ्रँचायझी धारकांना प्रत्येक उत्पादनाच्या एमआरपीवर कमिशन देते. म्हणजेच दुधाच्या विक्रीवर किमान 10 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते.

तसेच आइस्क्रीमच्या विक्रीवर 20 टक्के कमिशन तर हॉट चॉकलेट ड्रिंक्स, मिल्क शेक यांसारख्या उत्पादनांवर तब्बल 50 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळू शकते.

जर तुमची विक्री चांगली होत असेल तर तुम्हाला दरमहा एक लाख रुपयांपर्यंत कमिशन मिळू शकते.

How to Get Amul Franchise : अमूल फ्रँचायझीसाठी अर्ज कुठे करायचा?

अमूलची फ्रँचायझी विकत घेण्यासाठी तुम्हाला [email protected] या मेल ID वर जाऊनअर्ज करावा लागेल.

तसेच तुम्हाला https://amul.com/index.php अमूलच्या या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून अधिक माहिती मिळू शकते.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...