Tuesday , 10 September 2024
Home FinGnyan Home Loan Prepayment : होमलोन लवकर फेडायचा विचार आहे?
FinGnyanLoans

Home Loan Prepayment : होमलोन लवकर फेडायचा विचार आहे?

Home Loan Prepayment
Home Loan Prepayment

Home Loan Prepayment : घराची गरज दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राहण्यासाठी घर विकत घेणे, गुंतवणूक म्हणून घर घेणे ह्या दोन्ही परिस्थितीत कर्ज घेऊन घर घेतलेलं असल्यास त्या कर्जाची परतफेड हा सर्वात महत्वाचा भाग असतो.

घराचे मालक असणे ही एक मोठी आर्थिक गुंतवणूक असते, परंतु घराच्या मालकीसह येणाऱ्या आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी तयार असणे महत्त्वाचे आहे.

Home Loan Prepayment : होमलोन लवकर फेडायचा विचार आहे?

तुम्ही घरखरेदी करण्याचा विचारकरत असाल, तर तुम्ही एवढी मोठी खरेदी करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहात की नाही हे ठरवणे आवश्यक आहे.

ह्या संदर्भात मदत मिळवण्यासाठी आर्थिक सल्लागाराशी बोलणे महत्त्वाचे आहे.

तुम्ही घरासाठी खरेदी सुरू करण्यापूर्वी तुम्ही गृह कर्जासाठी pre-sanction कर्ज करून घेतले पाहिजे. यामुळे तुम्हाला किती कर्ज मिळेल,

आपण किती खर्च करू शकू ह्याचा अंदाज येईल. ह्यामुळे घर खरेदीची प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पार पडेल.

Home Loan Prepayment : मुदतीपूर्वी गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी, तुम्ही खालील गोष्टी अभ्यासून पाहा :

प्रीपेमेंट दंड तपासा :

कर्ज घेताना प्रथम काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. कर्ज परतफेडीसाठी काही प्रीपेमेंट दंड आहेत हे पाहावं. काही कंपन्या / बँकाकर्ज लवकर फेडण्यासाठी शुल्क आकारतात.

तुमच्या कामाचे नीट मूल्यांकन करा :

तुमच्याकडे एकरकमी पेमेंट करण्यासाठी किंवा तुमचे मासिक हफ्तारक्कम वाढवण्यासाठी पुरेसा निधी असल्याची खात्री करावी.

आपल्या आर्थिक परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत राहावा.

EMI वाढवा :

कर्ज परतफेडीला गती देण्यासाठी तुम्ही तुमचे समान मासिक हप्ते (EMIs) वाढवणे निवडू शकता. किंवा एका आर्थिक वर्षात एक तरी EMI जास्तीचा भरण्याची तयारी ठेवा.

एकरकमी पेमेंट करा :

तुमच्याकडे अतिरिक्त निधी आल्यास, मुद्दलात एकरकमी पेमेंट करण्याचा विचार करा.

तुमच्या कर्ज व्याजदर कमी करण्यासाठी प्रयत्न करा :

तुम्ही तुमच्या कर्जाचा व्याजदर कमी करण्यासाठी सातत्याने वित्तपुरवठा केलेल्या संस्थेची संपर्क साधून विनंती करू शकता. ह्यामुळे एकूण परतफेडीचा कालावधी कमी होण्यास मदत होऊ शकते.

कर्जाची पूर्वफेड करण्याच्या तुमच्या इराद्याबद्दल तुमच्या बँकेला किंवा वित्तपुरवठादार कंपनीला कळवण्याचे लक्षात ठेवा आणि सुरळीत प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या लवकर परतफेडीच्या प्रक्रियेचे अनुसरण करा.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...