Wednesday , 4 October 2023
Home FinGnyan What is Home Loan : ये होम लोन आखीर क्या है..? जाणून घेऊयात अधिक माहिती.
FinGnyanLoans

What is Home Loan : ये होम लोन आखीर क्या है..? जाणून घेऊयात अधिक माहिती.

What is Home Loan : “एक बंगला बने न्यारा-प्यारा-एक बंगला बने न्यारा”. फ्लॅट / घर खरेदी करणे हे अनेकांचे आयुष्यभराचे स्वप्न असते.

स्वतःचे घर ही आर्थिक आणि भावनिक अशी संपत्ती आहे. आपल्या कुटुंबासोबत जगतांना आयुष्यभर पुरतील अश्या आठवणी ह्याच मालकी असलेल्या घरात आपसूकच निर्माण होतात.

प्रॉपर्टी मधली गुंतवणूक ही एक अशी योग्य आर्थिक गुंतवणूक आहे जी आपण आपल्या भावी पिढ्यांसाठी वारसा म्हणून तयार करतो.

सध्याच्या काळात घर खरेदी करण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे रियल इस्टेटच्या/प्रॉपर्टीच्या गगनाला भिडलेल्या किमती.

मोठ्या शहरातल्या फ्लॅट्सच्या किमती साधारण 60 लाखापासून सुरु होतात. लोकेशन, अमेनिटीज, इतर सोयीसुविधा ह्यानुसार फ्लॅटच्या किमती कोटीच्या कोटी उड्डाणे करत आहेत.

घराचे स्वप्न साकारणे हे प्रत्येक पिढीतल्या तरुणाईचे स्वप्न असते. नोकरी करत असो वा व्यवसाय करणारा दोघांच्या स्वप्नातले घर जरी गरजेनुसार वेगवेगळे असले तरी ते स्वप्न साकारण्यास पैसे उभे करणे हा दोघांपुढील सारखाच प्रश्न असतो.

मग समोर येतं ते गृहकर्ज/ Home Loan कर्जदारांना त्यांच्या घराची स्वप्ने साकार करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक भांडवल पुरवते. परंतु, Home Loan मंजूर होण्यासाठी, कर्जपात्रता निकष आणि बँकेने नमूद केलेल्या इतर अटी व शर्तींची पूर्तता होणे आवश्यक असते.

हेही वाचा : Education Loan : एज्युकेशन लोनबद्दलची ए टू झेड माहिती; वाचा सविस्तर

होम लोन मंजूर होणे तसे सोपे नाही. अर्जदाराच्या नोकरीचा किंवा उत्पन्नाचा पुरावा, घेण्याची इच्छा असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे, उत्तम असा क्रेडिट स्कोअर (सिबिल) आणि इतरही बरीच अशी कागदपत्रांची यादी लोन देणाऱ्या बँकेला द्यावी लागते.

सध्या भारतात होमलोनचे काही प्रकार उपलब्ध आहेत –

जमीन खरेदीसाठी कर्ज (Purchase of Land) : घर बांधणीसाठी लागणाऱ्या जमिनीच्या खरेदीसाठी आपल्याला गृहकर्ज बँकेकडून मिळते.

गृहखरेदीसाठी कर्जे (Home Purchase) : नवीन घर विकत घेण्यासाठी बँक आपल्याला कर्ज देऊ शकते.

घर बांधणीसाठी कर्ज (Construction of a House) : नवीन घराच्या बांधणीसाठी देखील आपण बँकेत गृहकर्जाची मागणी करू शकतो.

घराच्या विस्तारासाठी (House Expansion or Extension) : घर अजून मोठं बांधण्यासाठी देखील बँक आपल्याला कर्ज देऊ शकते.

घराच्या सुधारणेसाठी (Home Renovation) : जुन झालेल्या घराच्या पुनर्बांधणीसाठी आपण बँकेकडे कर्जाची मागणी करू शकतो.

कर्ज शिल्लक हस्तांतरण (Home Loans Balance Transfer) :

घर पाहावे बांधून असं म्हणतात, ह्याचा अनुभव प्रत्येकाने एकदा जरूर घ्यावाच. परंतु अंथरून पाहून हातपाय पसरावे ही म्हण पण लक्षात ठेवावी.

Related Articles

Type of Business Partner : व्यवसायातल्या भागीदाराची प्रकार

Type of Business Partner : 1932 च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार भारतात भागीदारी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...

12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?

12 Tips for Buying a New Car : पहिली गाडी घेताना खूप...