Wednesday , 4 October 2023
Home FinGnyan Business Loan : व्यावसायिक कर्ज घेण्याचा फायदा काय?
FinGnyanLoans

Business Loan : व्यावसायिक कर्ज घेण्याचा फायदा काय?

Business Loan
Business Loan : Finntalk

Business Loan : “बिझनेस का दुसरा नाम पैसा होता है..” कुठल्याश्या जाहिरातीत हे वाक्य ऐकलेलं.

व्यवसाय करण्यासाठी पैसे लागतात आणि तोच व्यवसाय वाढविण्यासाठी जास्त निधी लागतो.

प्रत्येक व्यवसायाला त्याचा आकार आणि स्वरूप विचारात न घेता, वेळोवेळी निधीची आवश्यकता असते.

व्यवसाय कर्ज (Business Loan) हे एक असुरक्षित प्रकारात मोडणारे कर्ज (Unsecured Loans) आहे.

जे तुम्हाला तुमच्या वाढत्या व्यवसायाच्या तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यात मदत करू शकते.

व्यावसायिक कर्ज का घेतात?

चालू व्यवसाय वाढवण्यासाठी, उत्पादन वाढवण्यासाठी, व्यवसाय ऑनलाइन करण्यासाठी, इन्व्हेंटरी खरेदी करण्यासाठी, उपकरणे खरेदी करण्यासाठी, व्यावसायिक विस्तार, खेळते भांडवल, यंत्रसामग्री दुरुस्ती, खरेदी आणि बरेच काही करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी बिझनेस लोनसाठी अर्ज करता येतो.

हेही वाचा : Pradhan Mantri Swasthya Suraksha Nidhi : भारत सरकारची 5 लाखांची आरोग्य योजना.

लहान उद्योजक त्यांच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी Term Loan टर्म लोन/मुदत कर्ज, खेळते भांडवल कर्ज किंवा MSME Loan मिळवू शकतात.

तथापि, या कर्जांसाठी व्यवसाय नफा कमावणारा किंवा चांगली क्रेडिट स्थिती असणे आवश्यक आहे. कर्जाची रक्कम खूप जास्त असल्यास तारण ठेवून मगच कर्ज मिळू शकते.

व्यवसायासाठी नियमित आर्थिक पाठबळ, व्यवसाय टिकवण्यासाठी लागणारे भांडवल किंवा डेव्हलपमेंटसाठी विशिष्ठ कालावधीत रक्कम उभी करणे ह्या गोष्टी व्यवसाय यशस्वी चालवण्यासाठी महत्वाच्या पण गुंतागुंतीच्या ठरणाऱ्या आहेत.

त्याचमुळे ही unsecured loans भारतातील अनेक लघु उद्योग आणि स्टार्टअपसाठी फायदेशीर आहेत.

Business Loan :व्यावसायिक कर्ज ‘का’ महत्वाचे?

व्यावसायिक कर्ज (Business Loans) घेण्याचा मोठा फायदा म्हणजे त्याचा व्यवसायातील व्यक्तीच्या मालकीवर परिणाम होत नाही.

मालकाची हिस्सेदारी समान राहते आणि मिळवलेल्या कर्जासह धोरणे देखील लागू केली जाऊ शकतात.

उद्योजक या नात्याने Business Loans ची गरज जाणून घेऊन त्यासंदर्भात अद्ययावत माहिती ठेवणे फायद्याचे असते.

बाजारात बिझनेस लोन देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था आहेत. व्यवसाय करणाऱ्याने कर्ज घेताना विचार करून, परतफेडीची रचना करून मगच कर्ज घ्यावे.

आणि नंतर धुमसून काम करून कर्जाची परतफेड मुदतीपूर्वी होण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून क्रेडिट स्कोअर (Cibil Score) पण सुधारत राहतो आणि पुन्हा नव्याने कर्ज मिळवताना सोयीचे होते.

तू चाल पुढे तुला रे गड्या भीती कशाची ह्या उक्तीनुसार व्यावसायिक प्रगती करत रहावी…..

Related Articles

Type of Business Partner : व्यवसायातल्या भागीदाराची प्रकार

Type of Business Partner : 1932 च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार भारतात भागीदारी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...

12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?

12 Tips for Buying a New Car : पहिली गाडी घेताना खूप...