Wednesday , 4 October 2023
Home FinGnyan Unsecured Loan’s : असुरक्षित कर्ज म्हणजे काय? असुरक्षित कर्जाचे प्रकार कोणते?
FinGnyanLoans

Unsecured Loan’s : असुरक्षित कर्ज म्हणजे काय? असुरक्षित कर्जाचे प्रकार कोणते?

Unsecured Loan's : असुरक्षित कर्ज म्हणजे काय? असुरक्षित कर्जाचे प्रकार कोणते?
Unsecured Loan's : Finntalk

Unsecured Loan’s :दूध का कर्ज है, कभी भूल ना जाना” असले डायलॉग मारून कर्जाची आठवण करून दिली जाते.

गमतीचा भाग सोडून देऊ पण कर्ज विसरून चालत नाही. उपकार ह्या अर्थी असो की आर्थिक दृष्ट्या घेतलेले कर्ज.

मागील भागात आपण ‘सुरक्षित कर्ज’ ह्याबद्दल माहिती घेतली. ह्या भागात आपण ‘असुरक्षित कर्ज’ ह्याबद्दल समजून घेऊयात.

Unsecured Loan’s : असुरक्षित कर्ज

ह्या प्रकारच्या कर्ज प्रकरणात तारण घेतले जात नाही. कर्ज देणारा तुमची क्रेडिट हिस्ट्री पाहून मग तुम्हाला कर्ज देतो.

क्रेडिट स्कोअर चांगला असणाऱ्यांना अश्या प्रकारच्या कर्जाचा लाभ घेता येतो.

विनातारण असल्याने ह्या प्रकारातल्या कर्जाचे व्याजदर थोडे जास्त असतात. High Risk कॅटेगरीमधली कर्ज म्हणजे Unsecured Loan.

हेही वाचा : Career In Banking Sector : बँकिंग क्षेत्रातील काही करियर संधी.

प्रकार – Unsecured Loan’s Types

1) पर्सनल लोन (Personal Loans)

वैयक्तिक कर्ज (Personal Loans) हा प्रकार असुरक्षित कर्जाच्या सर्वात लोकप्रिय प्रकारांपैकी एक आहे.

मागणी नंतर त्वरित पुरवठा केले जाणारे लोन म्हणजे पर्सनल लोन.

ह्यांचे व्याजदर बऱ्यापैकी चढे असतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि कर्ज परतफेडीचा इतिहास चांगला असेल किंवा स्थिर नियमित उत्पन्न स्रोत असेल तर पर्सनल लोनमिल्ने सोपे जाते.

आपत्तीजनक घटना, सहल, मुलांच्या शिक्षणासाठी, कौटुंबिक विवाह किंवा अगदी वैयक्तिक इतर खर्च करण्यासाठी अश्या पर्सनल लोन Personal Loan घेणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे.

2) कमी कालावधीचे व्यावसायिक कर्ज (Short-Term Business Loan)

ह्याप्रकारात अल्पमुदतीसाठी घेतलेलं कर्ज जे विशिष्ठ कामासाठीच वापरले जाते.

त्याचा समावेश होतो. व्यावसायिक विस्तार, खेळते भांडवल, यंत्रसामग्री दुरुस्ती, खरेदी, विविध उपकरणे अश्या अनेक गोष्टींसाठी व्यवसायिकांकडून अश्या कर्जाचा लाभ घेतला जातो.

3) शैक्षणिक कर्ज (Education Loans)

देशांतर्गत किंवा विदेशात उच्च शिक्षणासाठी अश्या प्रकारच्या कर्जाला लोकप्रियता आहे.

सदरील कर्जामध्ये अभ्यासक्रमाची मूळ फी आणि इतर संबंधित खर्च जसे की निवास, परीक्षा शुल्क इ. यांचा समावेश होतो.

शैक्षणिक कर्ज प्रकारात विद्यार्थी हा प्राथमिक कर्जदार असतो तर पालक, भावंड किंवा जोडीदार हे सह-अर्जदार असतात. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्याने कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर म्हणजे शिक्षण संपल्यावर साधारण वर्षभराने EMI चालू होतो अशी तरतूद ह्या कर्जामध्ये आहे. तोपर्यंत केवळ व्याज भरणे आवश्यक आहे.

इंजिनियरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट ह्यासारख्या अभ्यासक्रमांसाठी Education Loan घेण्याचे प्रमाण जास्त आहे.

ह्या व्यतिरिक्त बरेच Loan Products आहेत जे Unsecured Loans ह्या कॅटेगरी मध्ये येतात.

प्रत्येक वित्तीय संस्था त्यांच्या अपेक्षित नियमावलीनुसार कर्ज वितरण करत असतात. कर्ज घेताना पन्नास वेळा विचार करावा,

कारण परतफेड वेळेत करणे म्हणजे आपला क्रेडिट स्कोअर (Credit Score) सुधारणे होय. गरज आणि आवश्यकता ह्याचे गणित आपल्या कमाईसोबत जोडून विचारपूर्वक कर्ज घ्यावे.

Related Articles

Type of Business Partner : व्यवसायातल्या भागीदाराची प्रकार

Type of Business Partner : 1932 च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार भारतात भागीदारी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...

12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?

12 Tips for Buying a New Car : पहिली गाडी घेताना खूप...