Wednesday , 4 October 2023
Home FinGnyan Secured Loans : सुरक्षित कर्जाचे प्रकार किती आणि कोणते? जाणून घ्या सविस्तर माहिती.
FinGnyanLoans

Secured Loans : सुरक्षित कर्जाचे प्रकार किती आणि कोणते? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Secured Loans

Secured Loans : “कर्ज तुम्हारा फर्ज हमारा” असा एक डायलॉग साथिया ह्या सिनेमात सतीश शहा ह्या ऍक्टरच्या तोंडी होता. अनेकदा कर्ज फेडले जाईल का ह्याकडे जास्त लक्ष दिले जाते.

मागच्या लेखात आपण लोन्सबद्दल माहिती पाहिली. त्यातल्या पहिल्या प्रकारची म्हणजे सुरक्षित कर्ज Secured Loans प्रकारात मोडणाऱ्या कर्जाची माहिती घेऊयात.

Secured Loans : https://finntalk.in/

Secured Loans : सुरक्षित कर्जाचे प्रकार –

HOME LOAN :

गृह कर्ज हा प्रकार तुम्हाला तुमच्या आवडीचे घर खरेदी करण्यासाठी किंवा बांधण्यासाठी Finance उपलब्ध करून देतो. घर नव्याने बांधले जात असेल तरी कर्ज मिळेल. आधीच बांधलेले घर असेल तरी कर्ज मिळेल. प्लॉट घेण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, घर नूतनीकरण Renovate करण्यासाठी होम लोन (Home loan) मिळू शकते.

कर्ज देणाऱ्या आर्थिक संस्थेच्या नियमांची पूर्तता केल्यावर कर्ज वितरित केले जाते.

हेही वाचा : india’s Richest And Poorest Chief Minister : सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?

LOAN AGAINST PROPERTY (LAP) :

मालमत्ता गहाण ठेवून मिळणारे कर्ज. सुरक्षित कर्ज प्रकारात हे कर्ज मोडते. रेसिडेन्शिअल प्रॉपर्टी, कमर्शिअल प्रॉपर्टी, मोकळा प्लॉट, दुकान, शेत, व्यावसायिक जागा इ इ प्रॉपर्टी प्रकार आर्थिक संस्थेकडे गहाण ठेवून आवश्यक त्या रकमेचे कर्ज मिळू शकते. प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूनुसार म्हणजे बाजारभावानुसार विशिष्ट टक्के रकमेपर्यंतचेच कर्ज ह्या प्रकारात मिळते.

LOAN AGAINST INSURANCE POLICY :

काही विशिष्ठ प्रकारात मोडणाऱ्या पॉलिसीच, ह्या कॅटेगरीत कर्ज मिळवून देण्यास कामी येतात. एंडोमेंट आणि मनी-बॅक पॉलिसी प्रकारातल्या पॉलिसी ज्यांना मॅच्युरिटीनंतर काही ना काही रक्कम मिळणार असते अश्या पॉलिसीवर कर्ज मिळू शकते.

Secured Loans : गोल्ड लोन

सोनेतारण कर्ज. तारण ह्या शब्दातच हे कर्ज सुरक्षित प्रकारात मोडते हे समजते. भारत देशात सोनेतारण कर्ज हा लोकप्रिय प्रकार आहे. तारण ठेवलेल्या सोन्याच्या बाजारभावनुसार एका विशिष्ठ मर्यादेत रक्कम कर्ज म्हणून मिळते. शॉर्ट टर्म लोन म्हणजे कमी कालावधीसाठीचे कर्ज म्हणून अनेकदा ह्या प्रकाराकडे पाहिले जाते.

LOANS AGAINST MUTUAL FUNDS AND SHARES :

म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सच्या बदल्यात कर्ज. एखाद्याकडे असलेले म्युच्युअल फंड्स आणि शेअर्सच्या भविष्यातील वाढीचा अंदाज घेऊन आत्ताच्या मुल्ल्यांकनानुसार अंदाजे 60-70 टक्के कर्ज दिले जाते. ह्यासाठी प्रत्येक आर्थिक यंत्रणेचा वेगवेगळा नियम असतो आणि तो बदलतही असतो.

LOANS AGAINST FIXED DEPOSITS :

बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीवर म्हणजे फिक्स डिपॉझिटवर कर्ज मिळण्याची सुविधा आहे. फिक्स डिपॉझिट असलेल्या रकमेच्या विशिष्ठ टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकते. फिक्स डिपॉझिट आणि रकमेची परतफेड ह्या दोन्हीमध्ये फिक्स डिपॉझिट ची मुदत जास्त असावी लागते.

पुढल्या लेखात आपण असुरक्षित कर्ज प्रकारची माहिती घेऊयात.

Related Articles

Type of Business Partner : व्यवसायातल्या भागीदाराची प्रकार

Type of Business Partner : 1932 च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार भारतात भागीदारी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...

12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?

12 Tips for Buying a New Car : पहिली गाडी घेताना खूप...