Friday , 24 May 2024
Home Investment नव्या वर्षात गृहिणींचं बजेट बिघडणार? 1 तारखेपासून ‘या’ नियमांत झाले बदल.
Investment

नव्या वर्षात गृहिणींचं बजेट बिघडणार? 1 तारखेपासून ‘या’ नियमांत झाले बदल.

FinNews : 2023 या नवीन वर्षात बँकिंग तसेच अनेक क्षेत्रातील नियमांत बदल होणार आहेत. याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परिणाम सर्वसामान्यांच्या आणि गृहिणींच्या बजेटवर होणार आहे. उद्यापासून कोण-कोणत्या नामांत बदल होणार? जाणून घ्या सविस्तर.

पोस्ट ऑफिस योजनेचा व्याजदर वाढणार –

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसांपासूनच पोस्ट ऑफिसने गुंतवणूकदारांना गिफ्ट दिल आहे. सरकारने पोस्ट ऑफिस योजनांच्या (Post Office Scheme) व्याजदरात 20 ते 110 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याजदर 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत.

वाहने महागणार –

वाहनांना लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे काही वाहन कंपन्यांनी वाहनांची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशातील टाटा मोटर्स, मर्सिडीज, रेनॉल्ट, मारुती, किया, ह्युंदाई, ऑडी आणि एमजी मोटर्स या कंपन्यांच्या वाहनांची खरेदी 1 जानेवारी पासून महाग झाली आहे.

क्रेडिट कार्डसंबंधी नियम बदलणार –

1 जानेवारी 2023 पासून HDFC बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्सच्या नियमांत काहीसा बदल होणार आहे. त्यामुळे ग्राहकांना 31 डिसेंबरपूर्वीच रिवॉर्ड पाईंट इनकॅश करून घ्यावे लागतील.

बँक लॉकरच्या नियमांत बदल –

ग्राहक आणि बँकेमध्ये लॉकरसंबंधीचा करार होईल. यात बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू किंवा कागपत्रांची सर्व जबादारी ही बँकेची असेल. तसेच लॉकरमधील कोणतेही गोष्टींचे नुकसान झाल्यास याची पूर्णपणे जवाबदारी बँकेची असणार आहे. यासोबतच ग्राहकांना लॉकरसंबंधीची सर्व माहिती SMS किंवा इतर पर्यायांद्वारे बँकांना द्यावी लागणार आहे. हा करार 31 डिसेंबरपर्यंत वैध राहील.

CNG आणि PNG च्या किंमती बदलू शकतात –

प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेचा पेट्रोलियम कंपन्या इंधनांच्या नव्या किमती जारी करत असतात. त्यामुळे उद्या CNG आणि PNG चे दर बदलण्याची शक्यता आहे. जर उद्या CNG आणि PNG च्या दारात वाढ झाली तर नव्या वर्षातच गृहिणींचं बजेट बिघडण्याची शक्यता आहे.

जीएसटीच्या नियमांत बदल –

केंद्र सरकारने GST’च्या ई-इन्वॉयसिंगची मर्यादा 20 कोटी रुपयांहून कमी करुन ती आता 5 कोटी रुपये केली आहे. म्हणजेच ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल 5 कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक आहे, त्यांना आता ईलेक्ट्रॉनिक बिल जनरेट करणे आवश्यक आहे.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...