Women’s IPL Auction : काल मुंबई येथे वूमन्स प्रीमियर लीगच्या (Women’s Premier League) पहिल्या सिझनसाठी लिलाव पार पडला. कालच्या लिलावात स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी सर्वच 5 संघांत चुरस पाहायला मिळाली. पण काही स्टार खेळाडूंना विकत घेण्यासाठी कोणत्याच संघानी उत्सुकता दाखवली नाही. यातच स्मृती मंधानावर अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक बोली लागली.
स्मृती मंधानाला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या फ्रँचायझीने 3.40 करोड रुपयांची बोली लावत खरेदी केलं. तर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईच्या संघाने करोडोंची बोली लावत आपल्या संघात सामील करून घेतलं. यासोबतच भारतासह जगभरातील अनेक खेळाडूंवर करोडोंची बोली काल लागली. तर जाणून घेऊयात कोणत्या फ्रँचायझीने कोणते खेळाडू विकत घेतले.
मुंबई इंडियन्सचा संघ :
हरमनप्रीत कौर (1.8 कोटी), नताली सायव्हर (3.2 कोटी) अमेलिया केर (1 कोटी), पूजा वस्त्राकर (1.9 कोटी), यास्तिका भाटिया (1.5 कोटी), हीदर ग्रॅहम (30 लाख), इसाबेल वोंग (30 लाख), अमनजोत कौर (50 लाख), धारा गुजर (10 लाख), सायका इशाक (10 लाख), हेली मॅथ्यूज (40 लाख), क्लो ट्रायॉन (30 लाख), हुमैरा खाझी (10 लाख), प्रियांका बाला (20 लाख), सोनम यादव (10 लाख), जिंतीमणी कलिता (10 लाख), नीलम बिश्त (10 लाख)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ :
स्मृती मानधना (3.4 कोटी), सोफी डिव्हाईन (50 लाख), एलिस पेरी (.7 कोटी), रेणुका सिंग (1.5 कोटी), रिचा घोष (1.9 कोटी), एरिन बर्न्स (30 लाख), दिशा कासट (10 लाख), इंद्राणी रॉय (10 लाख), श्रेयंका पाटील (10 लाख), कनिका आहुजा (35 लाख), आशा शोबाना (10 लाख), हीदर नाइट (40 लाख), डेन व्हॅन निकेर्क (30 लाख), प्रीती बोस (0 लाख), पूनम खेमनार (10 लाख), कोमल झांझाड (25 लाख), मेगन शुट (40 लाख), सहाना पवार (10 लाख)
दिल्ली कॅपिटल्सचा संघ :
जेमिमाह रॉड्रिग्ज (2.2 कोटी), मेग लॅनिंग (1.1 कोटी), शफाली वर्मा (2 कोटी), राधा यादव (40 लाख), शिखा पांडे (60 लाख), मारिझान कॅप (1.5 कोटी), तितास साधू (25 लाख), अॅलिस कॅप्सी (75 लाख), तारा नॉरिस (10 लाख), लॉरा हॅरिस (45 लाख), जसिया अख्तर (20 लाख), मिन्नू मणी (30 लाख), जेस जोनासेन (50 लाख), तानिया भाटिया (30 लाख), पूनम यादव (30 लाख), स्नेहा दीप्ती (30 लाख), अरुंधती रेड्डी (30 लाख), अपर्णा मंडल (10 लाख)
गुजरात जायंट्सचा संघ :
अॅशले गार्डनर (3.2 कोटी), बेथ मुनी (2.2 कोटी), सोफिया डंकले (60 लाख), ऍनाबेल सदरलँड (70 लाख), हरलीन देओल (40 लाख), डिआंड्रा डॉटिन (60 लाख), स्नेह राणा (75 लाख), सब्बिनेनी मेघना 30 लाख), जॉर्जिया वेयरहम (75 लाख), मानसी जोशी (30 लाख), दयालन हेमलता (30 लाख), मोनिका पटेल (30 लाख), तनुजा कंवर (50 लाख), सुषमा वर्मा (60 लाख), हर्ले गाला (10 लाख), पारुनिका सिसोदिया (10 लाख), शबनम शकील (10 लाख), अश्वनी कुमारी (35 लाख)
यूपी वॉरियर्स वूमन्सचा संघ :
सोफी एक्लेस्टोन (1.8 कोटी), दीप्ती शर्मा (2.6 कोटी), ताहलिया मॅकग्रा (1.4 कोटी), शबनीम इस्माईल (1 कोटी), एलिसा हिली (70 लाख), अंजली सरवाणी (55 लाख), राजेश्वरी गायकवाड. (40 लाख), पार्शवी चोप्रा (10 लाख), श्वेता सेहरावत (40 लाख), एस. यशश्री (10 लाख), किरण नवगिरे (30 लाख), ग्रेस हॅरिस (75 लाख), देविका वैद्य (1.4 कोटी), लॉरेन बेल (30 लाख), लक्ष्मी यादव (10 लाख), सिमरन शेख (10 लाख)
प्रीमियर लीगच्या लिलावात प्रत्येक फ्रँचायझींना खेळाडू खरेदी करण्यासाठी 12 कोटी रुपयांचं बजेट देण्यात आलं होत. या बजेट मधून प्रत्येक फ्रँचायझीला कमीत कमी 15 खेळाडू आणि जास्तीत जास्त 18 खेळाडू खरेदी करावे लागणार होते.
वूमन्स प्रीमियर लीगचा थरार कधी रंगणार?
बीसीसीआयने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार वूमन्स प्रीमियर लीगचा थरार येत्या 4 मार्च ते 26 मार्च 2023 या कालावधी दरम्यान रंगणार आहे. तसेच या सिझनमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत.