Friday , 13 September 2024
Home FinGnyan Saving Money : आज वाचवलेला पैसा भविष्यात तुम्हाला वाचवेल.
FinGnyan

Saving Money : आज वाचवलेला पैसा भविष्यात तुम्हाला वाचवेल.

Saving Money : कमाई सुरु झाल्यावर खर्चाचे मार्ग आपोआप दिसायला लागतात असं म्हणतात. एकदा का हातात पैसे आला की त्याच्या खर्चाच्या वाटा ठरायला वेळ लागत नाही.माणूस उधळा बनला, असं केंव्हा म्हणतात जेंव्हा तो कमाई उडवायला लागतो. म्हणजे कष्टाने मिळवलेली कमाई जेंव्हा बचतीचा मार्ग न स्वीकारता खर्चाच्या मार्गाला जाते आणि मिळालेली कमाई अपुरी पडायला लागते तेंव्हा उधळ्या ही पदवी बहाल होते.

नदीचा प्रवाह जर बदलायचा असेल तर ठरवून काही गोष्टी कराव्या लागतात, जसे की बांध घालून दिशा बदलणे. तसेच खर्चाचा प्रवाह बचतीकडे बदलणे आवश्यक असते. आपण कसा खर्च करतो आणि बचत कशी करतो ह्या प्रकारे आपण स्वतःला एक सवय लावतो. हीच सवय हळू हळू सवय मोठी होते. ती बदलणे अधिकाधिक कठीण होत जाते, कारण सवयी नन्तर अंगवळणी पडतात.

कमाई उधळण्याची सवय बदलण्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या खर्चाच्या पद्धती समजून घेणे. याचा अर्थ फक्त बजेट करणे आणि तुमचा खर्च नोंदवून ठेवणे नाही. दोन भावंडांमध्ये पण खर्चाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. एकाच घरात वाढलेले, एकाच पद्धतीने विचार संस्कार झालेले असले तरी दोघांमध्ये खर्च करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या विकसित होतात.

“A penny saved is a penny earned” ही म्हण बेंजामिन फ्रँकलिनने जगाला दिली. म्हणजेच काय तर कमावलेला पैसा वाचवणे आवश्यक आहे, तो वाया घालवून आपण अडचणी वाढवतो. दार महिन्याला होणारा खर्च जर आटोक्यात आला तर वाचवलेला पैसा बचतीकडे आणि कर्ज असल्यास ते फेडण्याकडे वळवता येतो.

येत्या महिन्यापासूनच पैसा वाचवायला सुरुवात करा. खर्च आटोक्यात आणून पैसे कर्ज फेडण्याकडे आणि नन्तर बचतीकडे वळवा. वॉरन बफे म्हणतो त्यानुसार खर्च करून उरलेले पैसे सेव्ह करण्यापेक्षा आधी सेव्हिंग करा आणि मग उरले पैसे तरच खर्च करा.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...