Saturday , 20 July 2024
Home Investment Why wealth creation is challenging : संपत्ती निर्माण करणे एक आव्हान ‘का’ असते?
Investment

Why wealth creation is challenging : संपत्ती निर्माण करणे एक आव्हान ‘का’ असते?

Why is wealth creation challenging : संपत्ती निर्माण करणे एक आव्हान 'का' असते?
Why is wealth creation challenging : Finntalk

Why wealth creation is challenging शिक्षण पूर्ण झाल्यावर चांगली नोकरी किंवा व्यवसाय सुरु व्हावा. त्यामधून पुरेशी कमाई व्हावी. कमाईतून बचत व्हावी. ही बचत वाढत जाऊन संपत्ती तयार व्हावी.

संपत्तीची सातत्याने वाढ होत राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. धनवान, श्रीमंत व्हावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिक असते.

संपत्ती असणारी माणसे पाहिली की आपणही त्यांच्यासारखे व्हावे असे वाटणे साहजिक आहे. वाटणे आणि तसे प्रत्यक्षात होणे ह्यात बराच फरक आहे.

कारण प्रत्यक्षात हे स्वप्न खरे व्हायला सातत्याने नियोजन (Financial Planning) आणि त्याची अमलबजावणी आवश्यक आहे.

सर्वात आधी मालमत्ता (Asset) आणि दायित्व (Liability) ह्यातला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

मालमत्ता निव्वळ उत्पन्न निर्माण करतात आणि दायित्वे म्हणजे खर्च. एसेट्स हे उत्पन्न देतात तर लायेबिलिटीवर निव्वळ खर्च होतो.

हेही वाचा : महाराष्ट्र वन विभागात 2 हजाराहून अधिक जागांवर भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या

Why wealth creation is challenging : Assets प्रकारात खालील गोष्टी येतात –

  • सेव्हिंग अकाउंटमधली बाजूला काढलेली रोख रक्कम
  • पेन्शन प्लॅन मधली गुंतवणूक
  • युलिप आणि तत्सम पॉलिसीमध्ये केलेली गुंतवणूक
  • आयुर्विमा आणि टर्म इन्शुरन्स
  • कर्ज नसलेली भाडे मिळवून देणारी प्रॉपर्टी
  • ह्या प्रकारातल्या गुंतवणूक जेंव्हा वाढत जातील तेंव्हा संपत्ती निर्माण होत राहते.

ज्या गुंतवणुकीतून रिटर्न्स चांगले आणि सातत्याने येतील ती गुंतवणूक wealth म्हणजे संपत्ती निर्माण करते. संपत्ती निर्माण करताना सुरुवातीला Liability कमी कश्या करता येतील ह्यावर लक्ष देणे जरुरी आहे.

तसेच केलेल्या गुंतवणूकीशिवाय नवीन गुंतवणूक कुठे कधी आणि कशी करता येईल ह्याकडे नियोजनबद्ध रीतीने विचार करत राहावा लागेल.

अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर, एका इन्कम सोर्स वर अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स सातत्याने कार्यरत राहतील ह्याकडे सातत्याने लक्ष ठेवावे लागेल.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...