Government Reduces GST Rate : जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तूंच्या जीएसटीमध्ये (Government Reduces GST Rate) मोठी कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली आहे.
Government Reduces GST Rate : कोणत्या वस्तूंवरील जीएसटीमध्ये कपात ?
भारताच्या अर्थमंत्रालयाने (Ministry of Finance) जीएसटी कमी केलेल्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे.
यामध्ये स्मार्ट टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मिक्सर, ज्युसर, व्हॅक्यूम क्लिनर व इतर घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच मोबाईल फोन्स यांच्या जीएसटी दरामध्ये 31.3% वरून 18% पर्यंत कपात करण्यात आली आहे.
हेही वाचा : पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटायचा आहे? ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या.
ह्यामुळे वरील सर्व गोष्टी सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशामध्ये मिळू शकतात. यासोबत आणखी काही वस्तूंच्या जीएसटीमध्ये (GST) कपात करण्यात आली आहे.
जीएसटी कमी झालेल्या वस्तूंची यादी :
- स्मार्ट टीव्ही (27 इंच पर्यंत) : 31.3% वरून 18% पर्यंत कमी.
- रेफ्रिजरेटर : 31.3% वरून 18% पर्यंत कमी.
- वॉशिंग मशीन : 31.3% वरून 18% पर्यंत कमी.
- घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणे : 31.3% वरून 18% पर्यंत कमी.
(मिक्सर, ज्युसर, व्हॅक्यूम क्लिनर इ.) - गिझर, पंखा, कुलर : 31.3% वरून 18% पर्यंत कमी.
- एलपीजी स्टोव्ह ; 21 वरून 18% पर्यंत कमी.
- एलईडी बल्ब : 15 वरून 12% पर्यंत कमी.
- शिवणकामाची मशीन : 16 वरून 12% पर्यंत कमी.
- यूपीएस : 28 वरून 18% पर्यंत कमी.
- केरोसीन प्रेशर कंदील : 8 वरून 5% पर्यंत कमी.
- मोबाईल फोन्स : 31.3% वरून 12% पर्यंत कमी.
एकंदरीत, जीएसटी नंतर सर्वसामान्यांसाठी आजची दुसरी चांगली बातमी आहे. तेल वितरण कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलेंडर आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडर यांच्या किमती सध्या स्थिर आहेत.