Mutual Funds : सध्याच्या काळात गुंतवणुकीकडे सर्वांचाचं कल वाढलेला आहे. वर्तमानात गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करण्याचा सर्वांचा मानस आहे, किबहुना आता अशी मानसिकता सर्वांची झाली आहे. वायफळ होणारा खर्च टाळून त्यांचं पैश्यांचा उपयोग कोणत्या-न कोणत्या गुंतवणुकीच्या योजनांमध्ये करायचा असा सल्ला पूर्वी थोरले मोठे लोग द्यायचे, आता हा साला अमलात आणला जात आहे. कारण सध्या अगदी दहा रुपयांपासून ही आपल्याला गुंतवणूक करता येते. कारण आता बँकिंग क्षेत्राचे डिजिटायझेशन झाले आहे. ह्यामुळे बँकिंग संबंधीचे सर्व कामे किंवा गुंतवणुकीसंदर्भातले कोणतेही कामे घरबसल्या आपल्याला करता येतात. तसेच बँकांनीही सर्वसामान्यांना गुंतवणुकीची सवय लागावी यासाठी योजना आणल्या आहेत. ह्याच्याच परिणामामुळे गुंतवणूक क्षेत्रामध्ये क्रांती घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते.
Mutual Funds : जागृत गुंतवणूकदार…
हेही वाचा : World Heritage Places In India : भारतातील जागतिक वारसा स्थळे.
सर्वसामान्य माणूस फक्त गुंतवणुकराचं राहिलेला नसून तो स्मार्ट आणि जागृत गुंतवणूकदार बनला आहे. पूर्वी लोक मुदत ठेव योजना, आवर्ती ठेव योजना, पीपीएफ यांसारख्या पारंपरिक गुंतवणुकीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत होते. पण आता तसं राहील नाहीये.. लोकांचा कल सुरक्षित तसेच जास्त परतावा देणाऱ्या योजनांकडे वळला आहे. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स मध्ये सर्वसामान्य माणूस जास्त प्रमाणात गुंतवणूक करत आहे. ह्यामुळे म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याची संख्या वाढली आहे. देशातील राज्यांचा विचार केला तर याबाबतीत महाराष्ट्र राज्य आधाडीवर आहे. ताज्या आकडेवाडीनुसार महाराष्ट्रात म्युच्युअल फंड्समध्ये तब्बल 17 लाख 01 हजार 900 करोड रुपयांची सर्वाधिक गुंतवणूक सध्या आहे. म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीच्या बाबतीत कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपास नाहीये.. याबाबत दुसऱ्या क्रमांकावर दिल्लीचा समावेश होतो. दिल्लीतील लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये 3 लाख 45 हजार 700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
Mutual Funds : म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीबाबत कोणतं राज्य आघाडीवर?
1) महाराष्ट्र – 17 लाख 01 हजार 900 करोड
2) दिल्ली – 3 लाख 45 हजार 700 करोड
3) कर्नाटक – 2 लाख 81 हजार 200 करोड
4) गुजरात – 2 लाख 79 हजार 400 करोड
5) पश्चिम बंगाल – 2 लाख 12 हजार 800 करोड
6) तामिळनाडू – 1 लाख 78 हजार 800 करोड
7) उत्तर प्रदेश – 1 लाख 77 हजार 100 करोड
8) हरियाणा – 1 लाख 66 हजार 800 करोड
9) राजस्थान – 70 हजार 600 करोड
10) तेलंगणा आणि मध्य प्रदेश – 58 हजार 400 करोड
म्युच्युअल फंड्स मध्ये सर्वात जास्त गुंतवणूक असणाऱ्या टॉप दहा राज्यांमध्ये वरील राज्यांचा समावेश होतो. यात महाराष्ट एक नंबरला असून महाराष्ट्राच्या आसपास देखील कोणताही राज्य नाही एवढी मोठी तफावत आहे. म्युच्युअल सही है..! या वाक्याचा खरा अर्थ आता या आकडेवारीतून दिसतोय.