Tuesday , 10 December 2024
Home FinGnyan GST रजिस्टेशन कधी अन् कसं करावं? वाचा संपूर्ण डिटेल्स.
FinGnyan

GST रजिस्टेशन कधी अन् कसं करावं? वाचा संपूर्ण डिटेल्स.

FinnGyan : व्यवसायाची सुरुवात करत असलेल्या बऱ्याच व्यावसायिकांमध्ये GST रजिस्टेशन कधी आणि कुठं करायचं याबाबद्दल शंका-कुशंका असतात. चला तर जाणून घेऊयात याबाबतची संपूर्ण माहिती.

सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात GST म्हणजे काय? GST हा एक कर (TAX) आहे जो भारतातील उत्पादने आणि सेवांच्या पुरवठ्यावर लादला जातो. Goods and service tax (वस्तू आणि सेवा कर) म्हणजे GST.

जीएसटी रजिस्टेशन कधी आवश्यक?

व्यवसायाची वार्षिक उलाढाल 40 लाखांपेक्षा अधिक असणाऱ्यांना GST नोंदणी करणं आवश्यक आहे. याआधी ही मर्यादा 20 लाखांपर्यंत होती. त्यानुसार जेव्हा व्यवसायाची एकूण उलाढाल विहित मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा GST लागू होतो.

ऑनलाइन अर्ज असा करा –

1) GST नोंदणीसाठी gst.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर टॅक्सपेयर्स टॅब अंतर्गत ‘नोंदणी करा’ पर्यायावर क्लिक करा.
2) त्यानंतर नवीन नोंदणीचा ​​पर्याय निवडा. त्यात दिलेली आवश्यक माहिती भरा.
3) कॅप्चा कोड भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल तो भरून त्यात ईमेल आयडी टाका.
4) आता पेजवर तुम्हाला तात्पुरता TRN नंबर (संदर्भ क्रमांक) दर्शवेल.
5) आता पुन्हा GST सेवा पोर्टलवर जा आणि ‘Taxpayer’ मेनूखाली ‘रजिस्टर करा’
6) TRN निवडून कॅप्चा भरा आणि. ‘Proceed’ वर क्लिक करा.
7) यानंतर तुम्हाला पुन्हा एक OTP येईल तो भरून ‘Proceed’ वर क्लिक करा.
8) आता तुम्हाला तुमच्या GST रजिस्टेशन ऑनलाइन अर्जाची स्थिती दिसेल.
9) उजव्या बाजूला तुम्हाला ‘Edit’ आयकॉनवर क्लिक करा.
10) त्यात माहिती भरून कागदपत्राची स्कॅन कॉपी जोडा.
11) आता Verification पेजवर क्लिक करून त्यात तुमचं डिक्लेरेशन तपासा
12) त्याला तुमची डिजिटल स्वाक्षरी जोडा. त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर नोंदणी यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल.
13) तुम्हाला एक अर्ज संदर्भ क्रमांक (ARN) दिला जाईल. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर AIN स्थिती तपासू शकता.

रजिस्ट्रेशनसाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक –

GST रजिस्टेशनसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, प्रमोटर्सचा पत्ता आणि आयडी पुरावा, बँक तपशील, पासबुक, कॅन्सल चेक, व्यवसायाचा आधार पत्ता, नोंदणी प्रमाणपत्र, डिजिटल स्वाक्षरी आणि अधिकृत स्वाक्षरीचे अधिकृत पत्र आवश्यक असेल.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...