Women’s IPL : पुरुषांप्रमाणेच आता महिलांचीही आयपीएल स्पर्धा होणार हे निश्चित झालं आहे. BCCI ने वुमन्स इंडियन प्रीमियर लीग सीझन (WIPL) 2023 – 2027 च्या मीडिया हक्कांसाठी निविदा (“ITT”) मागिवली होती. त्यासाठी 16 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. ही बोली प्रक्रिया यशस्वी पडली असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत दिली आहे.
मीडिया राईट्स Viacom18 कडे –
वुमन्स इंडियन प्रीमियर लीग (WIPL) सीझन 2023 – 2027 च्या मीडिया हक्कांसाठी आज बोली प्रक्रिया पार पडली. यात डिजनी प्लस हॉटस्टार, सोनी आणि झी असे अनेक मोठे स्पर्धक यामध्ये सामील झाले होते.पण या सर्व मोठ्या स्पर्धकांना मागे टाकत Viacom18 ने बाजी मारली आहे. Viacom18 ने सर्वाधिक 951 कोटी रुपयांची बोली लावत वुमन्स इंडियन प्रीमियर लीगच्या (WIPL) 5 वर्षांचे मीडिया राईट्स विकत घेतले आहेत. म्हणजेच Viacom18 प्रत्येक मॅचसाठी बीसीसीआयला 7.09 कोटी रुपये देणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले…
“मला खरोखर आनंद झाला आहे की आम्हाला एका लीगसाठी एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे जो केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडवेल. तसेच या खेळाला अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यात ब्रॉडकास्टरची महत्त्वाची भूमिका आहे आणि लीगमधील त्यांची सक्रियता हे महिला इंडियन प्रीमियर लीग योग्य दिशेने जात असल्याचे स्पष्ट संकेत आहे.
कधी सुरू होणार महिलांची IPL?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2022 मध्येच घोषणा केली होती की वर्ष 2023 पासून महिला आयपीएल सुरु होणार आहे. तसेच आता 25 जानेवारीला महिला आयपीएलच्या (WIPL) पाच संघांची घोषणा करण्यात येणार आहे. यसोनातच आयपीएलच्या 10 संघांपैकी 8 संघांनी महिला आयपीएल साठी टीम विकत घेण्यात रस दाखवला. टीम निश्चित झाल्यानंतर खेळाडूंच ऑक्शन होईल. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यांच्या दरम्यान महिला आयपीएलचा पहिला सीजन खेळला जाण्याची शक्यता आहे.