FinnGyan : संत गाडगेबाबा म्हणायचे कर्ज काढून सण साजरे करू नका. म्हणजे काय तर “अंथरूण पाहून पाय पसरावे”, आवश्यक असेल तितकाच खर्च करावा. मुख्य म्हणजे आपल्या कमाईचा आणि खर्चाचा मेळ बसायला हवा. मोठ्या प्रमाणावर घेतलेल्या कर्जाची परतफेड वेळेवर होणे आवश्यक असते. अन्यथा cibil स्कोअरवर परिणाम होतो, आणि एकदा आपलं सिबिल खराब झालं की नंतर आपल्याला कोणतंही कर्ज मिळण्यास अडचण निर्माण होते.
कर्ज ज्या कारणासाठी काढले आहे त्याच कामासाठी कर्जाचा विनियोग म्हणजे उपयोग करता येईल, नियम तर असेच सांगतो.
पण गेल्या काही वर्षातल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांवर नजर टाकल्यास आपल्याला प्रश्न पडतो की असे घोटाळे कसे होतात? पण यामागे अनेक कारणं असतात. ह्यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे diversion of funds. ज्या कारणासाठी कर्ज घेतले आहे त्या रकमेचा वापर वेगळ्याच कारणासाठी केला गेलेला दिसतो. अनेक मोठ्या घोटाळ्यामध्ये हीच परिस्थिती लक्षात येते. ह्यामुळे अनेक बँका बुडाल्या. तसेच बुडीत कर्जांची संख्या वाढली.
आता तुमच्या कर्जावर CCTV सारखी आहे –
अश्या सगळ्या गोष्टींवर तोडगा म्हणून सर्व मोठ्या बँकांनी आता एक यंत्रणा सुरू केली आहे.
काही खाजगी एजन्सीना आता बँकांनी वितरित केलेल्या कर्जाचा उपयोग कश्या प्रकारे केला जातोय ह्याकडे लक्ष देण्यास नेमले आहे. नुसतं व्यावसायिक कर्जच नाही तर वैयक्तिक पातळीवर घेतले गेलेले कर्ज देखील आता अश्या एजन्सीमार्फत चेक केले जाऊ शकते.
बँकींग मध्ये शिस्त यावी आणि कर्जाची परतफेड वेळेवर व्हावी ह्यासाठी अशी यंत्रणा उभारणे फायद्याचे ठरेल असा विश्वास अनेक बँकींग तज्ज्ञांनी बोलून दाखवला.