Tuesday , 7 May 2024
Home FinGnyan Importance of Insurance : ‘बिना विमा नहीं जिना’ : इन्शुरन्सची गरज मुलांच्या भविष्यासाठी.
FinGnyanInvestment

Importance of Insurance : ‘बिना विमा नहीं जिना’ : इन्शुरन्सची गरज मुलांच्या भविष्यासाठी.

Importance of Insurance : 'बिना विमा नहीं जिना' : इन्शुरन्सची गरज मुलांच्या भविष्यासाठी.
Importance of Insurance : Finntalk

Importance of Insurance : कोव्हीड काळानंतर मुलांच्या भविष्यासाठीची गुंतवणूक म्हणून प्रत्येक पालक इन्शुरन्सला महत्व देत आहे.

गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम म्हणून विमा उत्पादनांकडे तसा सर्वांचाच ओढा दिसतोय. भविष्यातली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी कमी जोखमीची (Low Risk Investment) पण तरीही विश्वासार्ह आर्थिक गुंतवणूक म्हणजे इन्श्युरन्स अशी आता लोकभावना झाली आहे.

Importance of Insurance : पालक सकारात्मक :

नुकताच एक सर्व्हे झाला त्यात 11 शहरातल्या लोकांकडून काही माहिती घेतली गेली.

त्यानुसार इन्श्युरन्स हा भविष्यातील गुंतवणूक म्हणून अनेक पालक आपल्या मुलांसाठी विचार करताना दिसत आहेत.

दहा वर्षांच्या आतल्या मुलांच्या पालकांच्या म्हणण्यानुसार, भविष्यातील वाढत्या शैक्षणिक खर्चाच्या नियोजनासाठी इन्शुरन्स घेणे हे महत्वाचे ठरते.

प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत खर्चाचे आकडे पालकांची चिंता वाढवत आहेत.

इन्शुरन्स मध्ये Unit Linked इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे ULIP, Endowment Plans आणि मनीबॅक (money back) प्लॅन्स घेण्याकडे पालकांचा कल दिसतोय.

लग्न, घर, संपत्ती ह्यापेक्षा मुलांच्या शिक्षणासाठी सेव्हींग करण्याचा मानस अनेकांनी बोलून दाखवला. मुलांचे भविष्य म्हणजे उत्तम शिक्षण हा उद्देश अनेक पालकांनी मान्य केलेला दिसला.

हेही वाचा : IB Recruitment 2023 : केंद्रीय गुप्तचर विभागात भरती सुरु; असा करा अर्ज.

कोव्हीडच्या साथीमुळे नोकरीची सुरक्षितता असेल किंवा व्यावसायिक यश असेल ह्या सगळ्यावरच प्रश्न उपस्थित केला आहे.

अनेकांना गुंतवणुकीत कपात करावी लागली. मुलांच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी गुंतवणूक करणे हा मोठा हेतू अनेकांचा आढळला.

सर्व्हेक्षणानुसार सुमारे 60 टक्के पालकांनी मूल 0 ते 3 वर्षाच्या आतले असताना गुंतवणुकीस सुरुवात केली.

तरीही अनेक पालकांना शंका वाटते की ही गुंतवणूक कमी तर पडणार नाही ना..? आपल्या समाजात आर्थिक शिक्षण आणि नियोजनाचे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे काही पालकांनी स्पष्ट केले.

आपणही आपल्या मुलांसाठी योग्य गुंतवणूक केली असेलच. नसल्यास आजच एखादी ULIP प्रकारात मोडणारी किंवा मनी बॅक पॉलिसीसाठी योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...