Saturday , 25 May 2024
Home FinGnyan Limits on cash Transactions : रोखीच्या व्यवहारावर आता मर्यादा.
FinGnyanFinNews

Limits on cash Transactions : रोखीच्या व्यवहारावर आता मर्यादा.

Limits on cash Transactions : स्पेशल छब्बीस, रेड ह्या अश्या चित्रपटात आपण पाहिलेलं की एखाद्याकडे किती कॅश सापडते. अनेकदा बातम्यांत पण आपण वाचतो की अमुक-तमुक अधिकाऱ्याकडे छापा मारल्यावर समोर आली एवढी रोकड किंवा ह्या राजकारण्याकडे सापडली एवढी रोख रक्कम वगैरे वगैरे. परंतु आता प्रमाणापेक्षा जास्त रोख रक्कम बाळगणे गुन्हा ठरू शकतो. प्रमाणापेक्षा जास्त म्हणजे नेमकं काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने काही नियमावली घालून दिली आहे.

Limits on cash Transactions : ह्यातही अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. त्यातल्या काही ठळक बाबी पुढील प्रमाणे-

  • एका आर्थिक वर्षात वीसलाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कॅश म्हणजे रोख स्वरूपात खर्च केल्यास दंड भरावा लागू शकतो.
  • कोणत्याही व्यवहारात पन्नासहजारांपेक्षा जास्त रक्कम कॅश स्वरूपात जमा करताना किंवा काढताना PAN क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.
  • एका आर्थिक वर्षात 20लाख रुपये कॅश स्वरूपात म्हणजे रोखीने जमा करत असताना PAN आणि आधार जमा करणे आवश्यक आहे.
  • खरेदी करत असताना जर रोखीने करायची असेल त्याची मर्यादा 2लाख इतकी केलेली आहे.
  • कोणत्याही कारणासाठी कॅश स्वरूपात नातेवाईकांकडून रक्कम स्वीकारायची असल्यास एका दिवसात 2लाखापेक्षा जास्त रक्कम स्वीकारता येणार नाही, आणि ते सुद्धा बँकेद्वारे करावे लागतील.
  • डोनेशन स्वरूपात कॅश द्यायची असल्यास तिची मर्यादा 2000 पर्यन्त सीमित करण्यात आलेली आहे.

कॅश को जाओ भूल…. बँक / कार्ड्स / नेटबँकिंग / UPI येही है नये जमाने के टूल.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...