Financial Magazines : भारतात अनेक वित्तविषयक मासिके प्रकाशित होतात. काही राष्ट्रीय पातळीवर तर काही स्थानिक पातळीवर. इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेतली देखील अनेक मासिके आहेत. भारतातील काही सर्वात लोकप्रिय वित्तविषयक मासिके:
फोर्ब्स इंडिया (Forbes India) –
भारतातील सर्वाधिक वाचले जाणारे आणि वित्तविषयक मासिकातले अग्रगणी असे हे मासिक आहे. ह्या मासिकात विविध उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी ह्यांच्याविषयी माहिती तसेच मुलाखती आणि व्यवसाय, वित्त आणि तंत्रज्ञान यासारख्या विषयांवरील माहिती समाविष्ट असते.
बिझनेस टुडे (Business Today) –
शेअर मार्केट मध्ये रुची असणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय असलेले मासिक म्हणजे बिझनेस टुडे. ह्या मासिकात शेअर बाजार, गुंतवणूक आणि उद्योग ट्रेंडवर विशेष असा भर देऊन व्यवसाय आणि वित्त-संबंधित बातम्यांवर सिरीज लिहिली जाते.
हेही वाचा : अर्थसाक्षर होणे आवश्यक का आहे?
आऊटलूक मनी (Outlook Money) –
अर्थक्षेत्रातील विविध घटना आणि मुलखाती ह्यांचा समावेश असलेले हे मासिक आहे. तसेच वैयक्तिक वित्त, गुंतवणूक धोरणे आणि बाजाराच्या ट्रेंडवर सल्ला ह्या मासिकात दिला जातो.
मनी टुडे (Money Today) –
हे मासिक वैयक्तिक वित्त, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन ह्यावर जास्त भर देते आणि त्याविषयक सर्वसमावेशक अश्या प्रकारातले लिखाण प्रसिद्ध करते.
दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट जर्नल (Dalal Street) –
शेअर मार्केट प्रेमी लोकांचे धर्मग्रंथ समजले जाणारे मासिक. भारतातील स्टॉक, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक संधींचे सखोल विश्लेषण ह्या मासिकात असते.
कॅपिटल मार्केट (Capital Market) –
सदरील मासिकात शेअर बाजारावर केलेले लिखाण जास्त प्रमाणात आढळते. त्याचसोबत कंपन्या त्यांच्या शेअर बाजाराच्या ट्रेंडचे तपशीलवार विश्लेषण प्रकाशित करते.
भारतात प्रसिद्ध होणारी ही वित्तविषयक मासिके गुंतवणूकदार, व्यवसाय मालक आणि भारतातील वित्त आणि अर्थशास्त्रात स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी भरपूर माहिती आणि ज्ञान प्रदान करतात. जितके आपण नियमित वाचन करत राहू त्याच बरोबर आपले ज्ञान वाढत राहील. ह्या मासिकांसोबतच विविध वृत्तपत्रात येणारे फायनान्शिअल कॉलम्स आणि आठवड्यातल्या अर्थविषयक बातम्यांचा आढावा घेतल्यास आपल्याला नकीच ज्ञानवाढीला मदत होईल