Tuesday , 3 December 2024
Home FinNews Real Estate Business : लक्झरी रिअल इस्टेटच्या बिझनेस मध्ये वाढ.
FinNewsInvestment

Real Estate Business : लक्झरी रिअल इस्टेटच्या बिझनेस मध्ये वाढ.

Real Estate Business : पूर्वी घर बांधायचं म्हटलं की आयुष्यभराची पुंजी कमी यायची. एखादा ठेकेदार बघा, त्याच्यडून आपल्या सोयीने पण बजेटमधले घर बांधून घ्यायचे. वाळू वाला बघा, विटा पहा, असे एक ना अनेक विषय असायचे. काहींना कटकट तर काहींना आनंद, अभिमान असायचा. पुल देशपांडे ह्यांच्या मी आणि माझा शत्रुपक्ष मध्ये एका कथेत ह्यासंदर्भात उल्लेख केला आहे.

Real Estate Business

काळ बदलला आणि नंतर बिल्डर, लँड डेव्हलपर, प्रॉपर्टी डेव्हलपर, आर्किटेक्ट, RCC कन्सल्टन्ट असे वेगवेगळे अँगल्स ह्या व्यवसायात आहे आणि हा व्यवसाय अंतर्बाह्य बदलला. बंगले बांधणारे, बिल्डिंग बांधणारे, टाऊनशिप बांधणारे, रो-हाउसेस बांधणारे, बांधकामातले विविध कामे पुरवणारे अश्या प्रकारातले व्यावसायिक तयार झाले.लोकांच्या गरजा समजून घेऊन पूर्वी घरे बांधली जात होतीच. पण आता लोकांच्या इन्कमकडे म्हणजेच त्यांच्या कमाईकडे पाहून सोयी सुविधा पुरवून घरांची निर्मिती करणारी यंत्रणा कामाला लागली.

रिअल इस्टेट (Real Estate) हा प्रकार आता लक्झरी रियल इस्टेट प्रकारात पण काम करायला लागला. लक्झरियस घरे (Luxurious Home) हा प्रकार आता लोकांना पण आवडू लागला आहे. गरज आणि आवड ह्या दोन्हीची सांगड घालून नव्या क्षितिजांना गवसणी घालणाऱ्या टाऊनशिप्स उभ्या राहिल्या लागल्यात. मोठ्या आणि लहान शहरांमध्येही अश्या प्रकारच्या लक्झरी घरांची मागणी हाऊ लागली आहे.

लक्झरी रिअल इस्टेटच्या मागणीत का वाढ झाली?

लक्झरी रिअल इस्टेटच्या मागणीत झालेली वाढ ज्या कारणांनी होते आहे त्यातली काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

  • हायब्रीड वर्क कल्चर, कमाईची साधने वाढलेली असणे, आधीच्या पिढीने केलेली गुंतवणूक आज कामाला येणे, लोकांची मोठ्या घरांसाठी असलेली इच्छा ह्याच सोबत
  • अर्थव्यवस्था म्हणून भारताची झपाट्याने वाढ होते आहे, ज्यामुळे रिअल इस्टेट सारख्या उच्च गुंतवणुकीकडे आता लोकं अधिक आकर्षित झाले आहेत.

रिअल इस्टेट गुंतवणुकीचा स्थिर पर्याय?

रिअल इस्टेटमधील गुंतवणूक (Investing In Real Estate) हा सुरक्षित आणि अधिक स्थिर पर्याय मानला जातो आहे. शेअर बाजारातील (Share Market) सातत्याने असलेली अस्थिरता, कोव्हीड सारख्या साथीच्या रोगानंतर भविष्यातील उत्पन्नाची अनिश्चितता कमी झाली आहे. त्यामुळे कष्टाचा पैसा गुंतवताना लोकं रिटर्न्सचा विचार करून गुंतवणूक करत आहेत. रियल इस्टेट (Real Estate) मधले रिटर्न्स सातत्याने वाढत असल्याने लोकांची त्यात गुंतवणूक वाढत आहे.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...