Investment In SIP : पैश्याचे झाड लावता असते तर किती बरे झाले असते, असा प्रत्येकाला कधी ना कधी विचार येतोच.
मात्र एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे झाड लावले की फळ यायला थोडा वेळ लागतोच.
SIP (Systematic Investment Plan) हे असेच एक झाड असते. ज्याचे रोपटे लावून त्याला खत पाणी घालून फळ यायची पाहावी लागते.
SIP म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund) पैसे गुंतवण्याचा हा एक खात्रीशीर मार्ग आहे.
महिन्याचा एका ठराविक निश्चित तारखेला SIPमध्ये पैसे बँक खात्यातून डायरेक्ट जमा होतात. त्यातूनच म्युच्युअल फंड युनिट्स खरेदी केले जातात.
Investment In SIP : गुंतवणुकीचा एक चांगला म्हणजे SIP
नियमित उत्पन्न असलेल्या लोकांसाठी गुंतवणुकीत शिस्त लावते. जर दीर्घ कालावधीसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल तर म्युच्युअल फंड्स सही है.
हेही वाचा : रेल्वेत एक हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या
कारण मार्केटच्या अस्थिरतेत फंड्स त्यांचे मूल्य टिकवून ठेवून परतावा जास्त देतात.
म्हणूनच म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा शिस्तबद्ध प्रकार म्हणून SIP’ला (SIP) प्राधान्य दिले जाते.
भविष्यासाठी गुंतवणूक करताना एकापेक्षा अधिक गुंतवणुकीचे पर्याय डोळ्यासमोर ठेवून केलेली गुंतवणूक जास्त फायद्याची. काही गुंतवणुकी फिक्स अश्या स्वरूपातल्या असाव्यात तर काही नियमित उत्पन्न देणाऱ्या असाव्यात.
कष्टाने लावलेल्या झाडाला नियमित पोषण देणे आवश्यक असते तेंव्हाच ते फळ देते. नियमित कमाई करायला सुरुवात झाल्यावर गुंतवणुकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
अडीअडचणीला, शिक्षणाला, लग्नासाठी, आजारपणात, पर्यटनाला अश्या अनेक कारणांसाठी बचत करणे आवश्यक ठरते. त्या बचतीसाठी कुठे ना कुठे गुंतवणूक करत राहणे आवश्यक आहे.
एक विचार वाचला होता… पैसा हा डेटॉल सारखा असतो, तो आयुष्यातले 99%प्रॉब्लेम्स दूर करू शकतो.