Wednesday , 11 September 2024
Home FinNews Indo-Nepal Hydroelectric Power Project : नेपाळ, भारत लॉन्ग टर्मसाठी वीज निर्यात करण्यास सहमत.
FinNewsWorldFinNews

Indo-Nepal Hydroelectric Power Project : नेपाळ, भारत लॉन्ग टर्मसाठी वीज निर्यात करण्यास सहमत.

Indo-Nepal Hydroelectric Power Project : भारताने वीज निर्मितीमध्ये क्रांती केली आहे. भारत स्वतःच्या देशाची विजेची गरज भागवून आता इतर दुसऱ्या देशांनाही वीज एक्स्पोर्ट करत आहे. सध्या भारत आणि नेपाळ यांच्या एसी संबंधाबाबत चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि नेपाळ यांच्यातले संबंध ताणलेले होते. त्याअनुशंघाने भारतीय परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा हे दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर गेले होते. विनय मोहन क्वात्रा यांच्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यात बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली. त्यात नेपाळ, भारत दीर्घकालीन वीज निर्यात करण्यास सहमत झाला आहे, ही सर्वात महत्वाची बाब आहे.यामधून नेपाळ येत्याकाही काळात करोडोंची कमाई करणार आहे.

Indo-Nepal Hydroelectric Power Project

नेपाळ, भारत लॉन्ग टर्मसाठी वीज निर्यात करण्यास सहमत :

नेपाळ आणि भारत लॉन्ग टर्मसाठी वीज निर्यात करण्यास सहमत झालेआहेत. भारतीय परराष्ट्र सचिव विनय मोहन क्वात्रा आणि नेपाळी समकक्ष भरत राज पौड्याल यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या द्विपक्षीय बैठकीत नेपाळ-भारत संबंधांच्या विविध पैलूंचा आढावा घेण्यात आला. तसेच या बैठकीत नेपाळमधून भारताला दीर्घकालीन वीज निर्यात करण्यास परवानगी देण्यास नेपाळकडून सहमती दर्शविण्यात आली. तसेच बॉर्डर ट्रान्समिशन लाइन्सचे तांत्रिक अपग्रेड आणि चार प्रस्तावित ट्रान्समिशनला लवकर मंजुरी देण्याबाबत चर्चा केली आहे.

अनेक मुद्यांवर झाली चर्चा –

भारत नेपाळच्या द्विपक्षीय बैठकीत कनेक्टिव्हिटी, व्यापार, उद्योग, ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य, कृषी, शिक्षण, संस्कृती, आरोग्य क्षेत्र यासह दोन शेजारी देशांमधील बहुआयामी सहकार्याच्या विषयांवर चर्चा झाली. यासोबतच दोन्ही परराष्ट्र सचिवांनी गेल्या वर्षी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान झालेल्या करारांच्या अंमलबजावणीमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला, ज्यामध्ये सीमापार संपर्क, जलविद्युत सहकार्य, संस्कृती, व्यापार आणि वाणिज्य या क्षेत्रांचा समावेश आहे,

नेपाळच्या जलविद्युत ऊर्जा निर्माण प्रकल्पात भारताची महत्वाची भूमिका

आता भारत नेपाळला जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करत असून त्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे. कारण नेपाळमधील मोठ्या प्रोजेक्ट्स मधून चीनने माघार घेतल्यानंतर नेपाळ अडचणीत सापडला होता. त्यानंतर भारत नेपाळच्या मदतीला आला आहे. भारत नेपाळमध्ये पश्चिम सेती जलविद्युत प्रकल्प आणि सेती नदी जलविद्युत प्रकल्प असे दोन जलविद्युत प्रकल्प विकसित करत आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च $2.4 अब्ज अपेक्षित आहे. या प्रकल्पनांतर्गत एकूण 1,200 मेगावॅट एवढी वीजनिर्मिती होणार आहे.

नेपाळ करोडोंची कमाई करणार?

इकॉनॉमी टाईम्सच्या अहवालानुसार, नेपाळ 2030 पर्यंत प्रति वर्ष 31,000 कोटी रुपये तसेच 2045 पर्यंत प्रति वर्ष 1 ट्रिलियन रुपये भारतासोबतच्या जलविद्युत ऊर्जा निर्माण प्रल्पांमार्फत कमवू शकतो.

Related Articles

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका असणार बंद

Bank Holidays In October 2023 : ऑक्टोबर महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...