Wednesday , 11 December 2024
Home FinGnyan The Psychology of Money : पैश्याचे मानसशात्र खरंचअसते का?
FinGnyan

The Psychology of Money : पैश्याचे मानसशात्र खरंचअसते का?

The Psychology of Money : जयंत कुलकर्णी अनुवादित असलेले हे पुस्तक पैश्याचे मानसशास्त्र जे मूळ मॉर्गन हौजेल ह्याने लिहिले आहे. रोजचे आयुष्य जगताना संपत्ती, ती मिळवण्याचा हव्यास आणि जगण्यातला, आयुष्यातला आनंद ह्याबद्दल हे पुस्तक भाष्य करते. पैसे कमावणे, ते अधिकाधिक मिळवणे हा अनेकांचा ध्यास असतो. लॉटरी काढणे, लोटो खेळणे, जुगारात पैसे लावणे अश्या गोष्टींपासून ते शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणे (Invest money in the Share market), म्युच्युअल फंड्समध्ये (Mutual Funds) पैसे टाकणे, भिशी लावणे ह्या सगळ्या प्रकारात लोकं गुंतवणूक करत असतात. खरंतर तरुणांनी वाचायलाच हवे अश्या कॅटेगरीमधले हे पुस्तक आहे.

The Psychology of Money

पुस्तकात छोट्या छोट्या गोष्टी घेऊन लेखकाने मांडणी केली आहे. जवळपास 19 छोट्या गोष्टी ह्या पुस्तकात आहेत. ज्याद्वारे आपल्याला पैसे आणि त्यानुषांगिक गोष्टी चटकन उमजतात. किती पैसे मिळवले म्हणजे सुखाने जगता येईल असा प्रश्न विचारला तर त्याचे नेमके उत्तर कुणालाच देता येणार नाही. कारण पैसा कितीही कमवा तो कमीच असतो.

हे पुस्तक वैयक्तिक पातळीवर तुम्हाला नक्कीच विचार करायला लावणारे ठरेल. पैश्याच्या संदर्भात लिहिताना लेखक अनेक खुमासदार उदाहरणांचा वापर करतात. तसेच सोप्या पण गमतीदार गोष्टींमधून रंजकतेने वाचकांना खिळवून ठेवतात. केवळ शेअर मार्केट (Share Market), म्युचल फंड्स (Mutual Funds) अश्या गुंतवणुकीबद्दल न बोलता आयुष्यात आवश्यक असलेल्या दृष्टिकोनाबद्दल हे पुस्तक मांडणी करते. पैश्याचा सुयोग्य वापर तुमच्या वर्तनावर अवलंबून असतो असं लेखक मांडतो. खर्च करताना तुमचे वर्तन कसे असते, विचार काय असतो ह्यावर त्या पैश्यांचा वापर अवलंबून असतो. पुस्तकाची प्रस्तावना म्हणजे सद्य आयुष्यात जगण्याच्या दोन महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारी आहे. आरोग्य आणि पैसा. ह्या दोन गोष्टींचा संबंध जोडून वित्तयंत्रणा स्पष्ट करण्याचा प्रयत्न लेखक करतो.

शिक्षण बदलले, आरोग्य यंत्रणा सुधारल्या, माणूस प्रगत झाला असे म्हणता येते पण wisdom शहाणपण येण्यासाठी विचार आणि वर्तनाची जोड लागते. ह्या पुस्तकात आर्थिक आणि मानसिक जडणघडणीवर सोप्या भाषेत प्रकाश टाकण्यात आलेला आहे.

पुस्तकाचे नाव – पैश्याचे मानसशास्त्र (The Psychology of Money)
प्रकाशक – मधुश्री प्रकाशन
अनुवाद – जयंत कुलकर्णी (मूळ लेखक Morgan Housel)
किंमत – 215/- रुपये.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...