Share Bazar Timing : भारतीय इक्विटी बेंचमार्क ट्रेड टाइमिंग मध्ये (Trade Timing of Equity Benchmarks) वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती वृत्तसंस्था रॉयटर्सने एका बिझनेस चॅनेलच्या हवाल्याने दिली आहे. त्यानुसार इक्विटी बेंचमार्क ट्रेड टाइमिंग साधारण दीड तासाने वाढवून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत होऊ शकतो. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) म्हणजेच सेबीने (SEBI) 2018 मध्येच वाढीव वेळेची रूपरेषा (Framework) जारी केली होती.
वेळ वाढविण्यासंदर्भात चर्चा सुरु –
शेअर बाजारच्या (Share Bazar) ट्रेडिंगचा वेळ वाढविण्यासंदर्भात शेअर बाजारातील (Share Bazar) भागीदारांशी सेबीची (SEBI) प्राथमिक चर्चा सुरू आहे, पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या देशांतर्गत ट्रेडिंगचा वेळ हा सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत आहे.
Zerodha चे CEO नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Zerodha चे CEO नितीन कामथ यांनी F&O ट्रेडिंग तास वाढवण्याविरुद्ध चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की ट्रेडिंगचे तास वाढवल्यावर किरकोळ गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ शकते. तसेच त्यांनी सांगितलं आहे की दीर्घकाळ P&L ट्रॅक करणे तणावपूर्ण आहे तसेच याचा त्यांच्या व्यापाराबाहेरील जीवनावर परिणाम होऊ शकते.