Loans : विनातारण कर्ज मिळणे हे एखाद्या व्यवसायिकासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट असते. केंद्र सरकारने आणलेली मुद्रालोन योजना तीन प्रकारात मोडते. जाणून घेऊयात याबद्दल माहिती…
1.) शिशु योजना – ह्यामध्ये ₹50000 पर्यंतचे कर्ज व्यावसायिकास मिळते. ज्याची परतफेड साधारण 5 वर्षात करणे आवश्यक आहे.
2.) किशोर योजना – ₹50000 ते ₹5 लाख पर्यंतचे कर्ज ह्या योजनेत मिळते ज्याची परतफेड प्रत्येक कर्ज प्रकरणानुसार वेगवेगळी असते.
3.) तरुण योजना – ह्या योजनेचे ₹5 लाख ते ₹10 लाखापर्यंतचे कर्ज व्यावसायिकास मिळते. ह्याची परतफेड कर्ज प्रकरणानुसार वेगवेगळी असते.
व्यावसायिक मुद्रा लोन मिळवण्यासाठी www.mudra.org.in ह्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.
यासाठी व्यावसायिक कागदपत्रे, अर्जदाराचे KYC आणि इतर आवश्यक कागदपत्रे भरून मुद्रा कर्जासाठी आपण अर्ज करू शकतो.