How to write a Cheque? : आपल्या सर्वांनाच धनादेश माहिती आहे. धनादेश म्हणजे ‘बँक चेक’ (Bank Cheque). धनादेश हा शब्दप्रयोग सध्या कोणी करत नाही. ‘बँक चेक’ हाच शब्द सध्या सर्वांच्या परिचयाचा आहे आणि व्यवहारामध्ये वापरला जाणारा आहे. व्यवहारांमध्ये पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी मुख्यतो या चेकचा वापर होतो. चेक देत असताना किंवा लिहीत असताना काळजीपूर्वक लिहिला पाहिजे. चेक चुकीचा लिहिल्यास तो वटवला जात नाही. त्यामुळे एका चुकीने वेळ वाया जाण्यासोबत समोरच्या व्यक्तीलाही त्याचा अतिरिक्त त्रास होतो. त्यामळे चेक नीट आणि काळजीपूर्वक लिहून तपासाला पाहिजे.
मागील लेखात आपण धनादेश म्हणजे काय? (What is Cheque) धनादेश हा व्यासायिकांसाठी कसा महत्वाचा असतो. याबद्दल माहिती पहिली. आज धनादेश कसा भरला पाहिजे? (How to write a Cheque?) याबद्दल माहिती जाणून घेऊयात…
How to write a Cheque? : धनादेश कसा भरला पाहिजे?
चेक भरत असताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. घाईगडबड न करता काळजीपूर्वक लिहिला पाहिजे. धनादेश कसा लिहायचा? (How to write a Cheque?) याबाबतच्या खाली स्टेप्स दिल्या आहेत.
1) चेकची तारीख – वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ओळीवर तारीख लिहा. उदा. १५-०३-२०२३ अशी तारीख लिहावी.
2) चेक हा कोणासाठी आहे? – चेक कोणासाठी आहे? व्यक्तिगत आहे की संस्थेसाठीआहे? त्याचे नाव स्पष्ट लिहावे. उदा. अमिताभ बच्चन किंवा अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड.
3) देय रक्कम – देय रक्कम स्पष्ट शब्दांत (अक्षरी) आणि आकड्यात (अंकात) लिहिली गेली पाहिजे.
4) स्वाक्षरी – बँकेत खाते उघडताना तुम्ही जी स्वाक्षरी केली होती तशीच स्वाक्षरी तुम्हाला चेक भरताना करायची आहे. स्वाक्षरी चुकल्यास चेक वटवला जात नाही.
चेक भरताना काळजी अवश्य घेतली पाहिजे. चेक लिहीत असताना एकाच पेनचा वापर केला पाहिजे. दोन वेगवेगळ्या रंगाच्या पेनचा वापर ग्राह्य धरला जाऊ शकत नाही. तसेच चेक लिहिताना विना खाडाखोड आणि न गिरवता लिहिला गेला पाहिजे. अशा छोट्या क्षुल्लक चुका चेक लिहितांना टाळल्या पाहिजे.