Tuesday , 21 May 2024
Home FinGnyan MJPJAY Health Scheme : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार.
FinGnyanFinNews

MJPJAY Health Scheme : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, आता 5 लाखांपर्यंत मिळणार मोफत उपचार.

MJPJAY Health Scheme : राज्यातील गरीब जनतेला चांगल्या आरोग्यसेवा मिळत नाही. सर्वसामान्य माणसांच्या तुटपुंज्या पगारातून ठराविक गरजा देखील भागल्या जात नाही. त्यामुळे आरोग्यासाठी वेगळं बजेट काढायचं हे त्यांच्या डोक्यात देखील नसत. रोजचा खर्च भागला की झालं, अशी त्यांची मासिकता झालेली आहे. त्यातचं मोठं आरोग्य विषयक संकट आलं की सर्वसामान्य माणूस पूर्ण कोलमडून पडतो. पैशांची जमवाजमव करता करता नाकीनऊ येतात. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना’ (MJPJAY Health Scheme) सुरु केली आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेत सरकारने मोठी तरतूद केली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजेनेतील विमा संरक्षण मर्यादा वाढली –

यंदाच्या अर्थसंकल्पात महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत MJPJAY Health Scheme) राज्य सरकारने मोठी तरतूद केली आहे. राज्य सरकारने या आरोग्यविषयक योजेनेची विमा संरक्षण मर्यादा 1.50 लाखांहून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. अशी घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत मिळणार आहे.

हेही वाचा : Summer Diet : उन्हाळ्यात आहार कसा असला पाहिजे? कोणत्या आहारातून आपल्याला पोषकतत्वे मिळतात?

योजनेत 200 नवीन रुग्णालयांचा समावेश आणि बरंच काही…

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजेनेत MJPJAY Health Scheme) 200 नवीन रुग्णालयांचा समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या विमा संरक्षणाची मर्यादा अडीच लाखांहून 4 लाखांपर्यंत वाढवली आहे.

काय आहे महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना?

महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या दारिद्ररेषेखालील लोकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या मानसिकतेने राज्यसरकारने 2 जूलै 2012 रोजी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात केली. ही योजना सर्वप्रथम राज्यातील आठ जिल्ह्यांत सुरु झाली होती. त्यानंतर 21 नोव्हेंबर 2013 ला ही योजना 28 जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय राज्यसरकारने. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजना (MJPJAY) हे करण्यात आले. या योजनेअंतर्गत 996 प्रकारच्या गंभीर तसेच खूप खर्चिक असणाऱ्या शस्त्रक्रिया आणि त्यावर उपचार करता येतात. आता या योजेनेची विमा संरक्षण मर्यादा वाढवल्यामुळे अनेक लोकांचा फायदा होणार आहे.

‘या’ योजनेचा लाभ कोणाला?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे पिवळं रेशनकार्ड, अत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना तसेच केशरी रेशनकार्ड असं आवश्यक आहे. याशिवाय शासनाद्वारे चालवले जाणारे वृद्धाश्रम, शाळा, महिला आश्रम, शासकीय अनाथालय यातील सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो.

योजनेचा फायदा कसा घ्यायचा?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत MJPJAY Health Scheme) लाभार्थ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र (ID) दिले जाते. या ओळखपत्राच्या मदतीने तुम्ही संबंधित रुग्णालयात 5 लाखांपर्यंत मोफत उपचार घेऊ शकता. जर आपातकालीन स्थितीत तुमच्याकडे या योजनेचं ओळखपत्र नसल्यास तुम्ही रेशकार्ड तसेच कोणतेही ओळखपत्र (आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्राइविंग लायसन्स इ.) या सरकारी कागतपत्रांचा वापर करू शकता.

नोंदणी कशी करायची?

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा MJPJAY Health Scheme) लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्णलयांमध्ये आरोग्य मित्र असतात. हे आरोग्यमित्र पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची आँनलाईन नोंदणी करतात.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...