Tuesday , 10 December 2024
Home Investment Gold Storage Rule : तुमच्या घरात तुम्ही किती सोने ठेवू शकता? सोन्यावरील कराचे नियम कोणते? समजून घ्या सविस्तर.
Investment

Gold Storage Rule : तुमच्या घरात तुम्ही किती सोने ठेवू शकता? सोन्यावरील कराचे नियम कोणते? समजून घ्या सविस्तर.

Gold Storage Rule
Gold Storage Rule : Finntalk

Gold Storage Rule : भारतात सध्या लग्नसराईचा सिझन सुरु आहे त्यामुळे भारतीयांची सोने खरेदी जोरात सुरु आहे.

तसेच बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वळला आहे.

परिणामी सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी 48 हजारांवर असणार सोन आता 63 हजारांच्याही पार गेलं आहे.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता? (How much Gold can you keep in your House?)

तसेच सोन्यावरील कराचे नियम कोणते? (What are the Tax rules on Gold?) माहित नसेल तर नक्की जाणून घ्या.

Gold Storage Rule : कोण किती सोने साठवू शकतो?

देशात किती सोने कोण ठेवू शकते याबाबत CBDT’चे (Central Board of Direct Taxes) काही नियम आहेत.

हेही वाचा : Bank of Maharashtra Recruitment 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मोठी भरती सुरु; How to apply?

त्यानुसार, विवाहित महिला स्वतःकडे 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तसेच अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने तर एक माणूस 100 ग्रॅम सोने स्वतःकडे ठेऊ शकतो .

Gold Storage Rule : सोन्यावरील कराचा नियम काय?

तुम्ही तुमच्या उत्पन्नातून, घरगुती खर्चात बचत करून किंवा शेतीतून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले असेल तर त्यावर कर लागणार नाही.

तसेच वारसाहक्काने मिळालेल्या सोन्यावर देखील कर भरावा लागत नाही पण वारसाहक्काने मिळालेले सोने कोठून आले याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.

विक्रीवर कर भरावा लागतो?

सोने ठेवण्यावर कोणताही कर नाही, पण तुम्ही सोने तीन वर्षे ठेवल्यानंतर विकल्यास, या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 20% दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long Term Capital Gains Tax) भरावा लागेल.

तसेच गोल्ड बाँडलाही हाच नियम लागू होईल. परंतु तुम्ही बॉण्ड मॅच्युरिटीपर्यंत ठेवलात तर त्याच्या व्याजदरावर कोणताही TAX भरावा लागणार नाही.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...