Medium Term Investment Plans : तुम्हाला काही काळासाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मध्यम-मुदतीच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
उदाहरणार्थ, लग्नासाठी बचत करायची आहे, घराचे नूतनीकरण करायचे आहे किंवा इतर काही कामासाठी तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.
म्हणजे 3 ते 5 वर्षापर्यंत तुम्ही या मध्यम-मुदतीच्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.
‘या’ आहेत मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक योजना –
Medium Term Investment Plans : राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (National Savings Certificates)
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट किंवा NSC हे भारत सरकारद्वारे संचालित पोस्ट ऑफिसची एक बचत योजना आहे.
ही योजना 5 वर्षांच्या FD प्रमाणेच काम करते.
हेही वाचा : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
तसेच यामध्ये तुम्हाला 7% वार्षिक व्याज मिळेल. परंतु संपूर्ण रक्कम केवळ मॅच्युरिटी नंतरच तुम्हाला तुमच्या पाहत भेटेल.
त्यामुळे तुमच्या 5 वर्षानंतरच्या गरजेला NSC हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे.
Medium Term Investment Plans : पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट (Post Office Time Deposit)
बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील एफडी (Fixed Deposit) ऑफर करतात.
त्यानुसार पोस्ट ऑफिसची नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिट ही स्कीम देखील गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे.
नॅशनल सेव्हिंग्ज टाइम डिपॉझिटचा फायदा हा आहे की ते बँकांपेक्षा चांगले परतावा देतात. आणि तेही कोणत्याही अतिरिक्त जोखमीशिवाय कारण या योजनांना भारत सरकारचा पाठिंबा आहे.
Hybrid Funds : हायब्रीड फंड
या प्रकारचे म्युच्युअल फंड्स हे एकापेक्षा जास्त मालमत्ता श्रेणींमध्ये गुंतवणूक करतात.
पण काही हायब्रीड फंड सोन्यात किंवा रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करतात. या फंडांचा फायदा असा आहे की तुम्हाला एकाच फंडात इक्विटीची वाढ आणि कर्जाची स्थिरता दिसते.