Saturday , 20 July 2024
Home FinGnyan Current Account : व्यवसाय करताय आणि चालू खाते उघडले नाही? हे जरूर वाचा.
FinGnyan

Current Account : व्यवसाय करताय आणि चालू खाते उघडले नाही? हे जरूर वाचा.

Current Account : करंट अकाउंट म्हणजे चालू खाते – व्यवसाय करताना आर्थिक व्यवहार करण्यासाठी चालू खाते असणे अत्यावश्यक असते. ‘चालू खाते हे व्यावसायिक पातळीवर विविध गरजांसाठी तयार केलेले जमा खाते असते.’

हे खाते व्यवसायांना मोठ्या प्रमाणात दैनंदिन व्यावसायिक व्यवहार हाताळण्यास मदत करते. व्यवसायातील आर्थिक व्यवहार करणे ह्या अकाउंटमुळे खूप सोपे होते.

व्यवसाय अधिकृत करण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे बिझनेस बँक खाती (Business Bank Accounts) म्हणजेच चालू खाते.

हे बिझनेस ओनर्सना त्यांच्या खर्चाचे डॉक्युमेंटेशन आणि त्यांचा ट्रॅक ठेवण्यास मदत करतात.

व्यवसायासाठी जवळपास सर्व व्यावसायिक बँका व्यावसायिक हेतूंसाठी करंट अकाउंट उघडण्यास परवानगी देतात.

Current Account नेमकं कोणासाठी?

चालू खाते सहसा Unlimited Transactions करण्यास मुभा देते. परंतु खात्यातील रकमेवर कोणतेही व्याज स्वरूपातले उत्पन्न देत नाही.

ही प्रामुख्याने संस्था, व्यवसाय मालक, कंपन्या, फर्म इत्यादींसाठी डिझाइन केलेले आहे.

ह्या खात्याची किमान शिल्लक रक्कम (minimum account balance) ही बचत खात्यापेक्षा जास्त असते.

जेव्हा व्यवसायांचे स्वतःचे करंट अकाउंट्स (Current Account) असतात, तेव्हा ते त्यांच्या वैधतेत म्हणजे व्यवसायाची authenticity वाढवण्यात भर घालतात.

  • चालू खात्याच्या मदतीशिवाय व्यवसाय चालवणे म्हणजे नॉन प्रोफेशनल म्हणजे अव्यावसायिक म्हणून इमेज तयार होते. करंट अकाउंट म्हणजे ग्राहकांच्या विश्वासाचा एक भाग असतो.
  • व्यावसायिक पातळीवरील सर्व बँका त्यांच्या चालू खाती असलेल्याना अमर्यादित पैसे काढणे अन जमा करणे तसेच या व्यतिरिक्त डिमांड ड्राफ्ट (Demand Draft), एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) व्यवहार आणि पे ऑर्डर (Pay Order) अश्या प्रकारच्या सर्व्हिसेस देतात.
  • या व्यतिरिक्त विशेषत: व्यवसायासाठी असलेल्या चालू खात्यासह, सर्व व्यवहार कार्यक्षमतेने आणि वेळेवर करणे शक्य होते. ज्यामुळे व्यवसायाचे पुरवठादार supplier आणि ग्राहक customer या दोघांशीही सकारात्मक संबंध राखणे शक्य आहे.

व्यवसायासाठी फायदेशीर –

बिझनेसमध्ये पुढे जात असताना अश्या प्रकारच्या चालू खात्यांमधून कायमस्वरूपी व्यवहार केल्याने व्यवसायाची एक पत तयार होते आणि भविष्यातल्या कर्ज प्रकरणामध्ये त्याचा फायदा होतो. खेळते भांडवल (Working Capital) मिळविण्यासाठी, कॅश क्रेडिट (Cash Credit) मिळवण्यासाठी, व्यवसाय विस्तारासाठी (Business Development कर्ज मिळवण्यासाठी बँक व्यवसायाच्या करंट अकाऊंटमधील व्यवहार तपासतात.

तुमचा व्यवसाय वाढावा ह्यासाठी बँकेतल्या जबाबदार व्यक्तीसोबत संपर्क करा आणि करत अकाउंट बद्दल अधिक माहिती अन त्याचे फायदे जाणून घ्या.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...