Gold Storage Rule : भारतात सध्या लग्नसराईचा सिझन सुरु आहे त्यामुळे भारतीयांची सोने खरेदी जोरात सुरु आहे.
तसेच बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वळला आहे.
परिणामी सोन्याच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी 48 हजारांवर असणार सोन आता 63 हजारांच्याही पार गेलं आहे.
परंतु तुम्हाला हे माहित आहे का की तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता? (How much Gold can you keep in your House?)
तसेच सोन्यावरील कराचे नियम कोणते? (What are the Tax rules on Gold?) माहित नसेल तर नक्की जाणून घ्या.
Gold Storage Rule : कोण किती सोने साठवू शकतो?
देशात किती सोने कोण ठेवू शकते याबाबत CBDT’चे (Central Board of Direct Taxes) काही नियम आहेत.
त्यानुसार, विवाहित महिला स्वतःकडे 500 ग्रॅम सोने ठेवू शकते. तसेच अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने तर एक माणूस 100 ग्रॅम सोने स्वतःकडे ठेऊ शकतो .
Gold Storage Rule : सोन्यावरील कराचा नियम काय?
तुम्ही तुमच्या उत्पन्नातून, घरगुती खर्चात बचत करून किंवा शेतीतून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले असेल तर त्यावर कर लागणार नाही.
तसेच वारसाहक्काने मिळालेल्या सोन्यावर देखील कर भरावा लागत नाही पण वारसाहक्काने मिळालेले सोने कोठून आले याची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
विक्रीवर कर भरावा लागतो?
सोने ठेवण्यावर कोणताही कर नाही, पण तुम्ही सोने तीन वर्षे ठेवल्यानंतर विकल्यास, या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 20% दराने दीर्घकालीन भांडवली नफा कर (Long Term Capital Gains Tax) भरावा लागेल.
तसेच गोल्ड बाँडलाही हाच नियम लागू होईल. परंतु तुम्ही बॉण्ड मॅच्युरिटीपर्यंत ठेवलात तर त्याच्या व्याजदरावर कोणताही TAX भरावा लागणार नाही.