Franchise Business : तुम्ही नोकरीला कंटाळला असाल तर सरकार देत असलेल्या फ्रॅन्चायसी विकत घेऊन व्यायसाय सुरु करून नफा कमवू शकता. म्हणजेच सरकारचा मित्र बनून तुम्ही काम करू शकता. जाणून घ्या या या फ्रेंचायजी बाबाबत सविस्तर माहिती…
Franchise Business : Aadhar card Franchise –
तुम्ही आधार कार्ड फ्रेंचायजी देखील सहज मिळवू शकता. त्यासाठी तुम्हाला UIDAI’ने घेतलेली परीक्षा पास करावी लागेल. त्यानंतर आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी लागते. मग कॉमन सर्व्हिस सेंटरकडे नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचा परवाना मिळतो.
हेही वाचा : IBPS मार्फत 4 हजाराहून अधिक जागांसाठी भरती सुरु; अर्ज कसा आणि कुठे करायचा? जाणून घ्या.
Franchise Business : Post office Franchise –
तुम्ही Post office Franchise उघडून देखील चांगलाच नफा कमावता येईल. फक्त 5000 रुपये खर्च करून तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी विकत घेऊ शकता. यातून तुम्हाला कमिशनच्या माध्यमातून कमाई करता येईल.
IRCTC Ticket Agent-
IRCTC च्या मदतीने फक्त तिकीट एजंट म्हणून काम करून तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकता. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला IRCTC Ticket Agent बनण्याचा परवाना घ्यावा लागेल.