Friday , 10 May 2024
Home FinGnyan EPFO ऑल अबाऊट प्रॉव्हिडंट फंड : नोकरी करणाऱ्यांना ‘ह्या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात.
FinGnyan

EPFO ऑल अबाऊट प्रॉव्हिडंट फंड : नोकरी करणाऱ्यांना ‘ह्या’ गोष्टी माहीत असायलाच हव्यात.

नोकरदार असणाऱ्या EPFO ​​(Employees Provident Fund) सदस्यांसाठी UAN नंबर (Universal Account Number) खूप महत्वाचा असतो. कारण EPFO मार्फत (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या रिटायरमेंट नंतरच्या आयुष्यासाठी फंड तयार होत असतो. यात तुमच्या UAN नंबरला तुमचा बँक अकाउंट नंबर लिंक असतो. (UAN number linked to bank account number) परंतु जर UAN नंबरला लिंक असलेले तुमचे बँक अकाउंट बंद पडले किंवा UAN नंबरला दुसरे बँक अकाउंट जोडायचे असेल तर काय करायचं? जाणून घेऊयात संपूर्ण प्रोसेस..

EPFO बँक अकाउंट बदलण्याची प्रोसेस –

1) सर्वप्रथम EPFO ​​सदस्य ई-सेवा https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

2) त्यानंतर UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

3) समोरील मॅनेज या टॅबवर जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘KYC’ हा पर्याय निवडा.

4) त्यानंतर बँक अकाउंट निवडा व तिथे विचारलेली IFSC कोडसह बँक खात्याची संपूर्ण माहिती भरा.

5) भरलेली सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करून घ्या आणि सेव्ह करा.

EPFO आणि UAN नंबर म्हणजे नेमकं काय?

EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) ही एक अशी संस्था आहे जी कंपनीतील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीसाठी निधी वाचवण्यासाठी प्रोत्साहन देते. तसेच तसेच या वर्गाला बचतीची सवय लागावी असाही या संस्थेचा उद्देश आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ही संस्था केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाद्वारे संचालित करण्यात येते. तसेच EPFO ची स्थापना 1951 मध्ये झाली होती.

EPFO मार्फत अशी होते गुंतवणूक –

EPFO अंतर्गत तीन वेगवेगळ्या कायद्यांद्वारे गुंतवणूक करता येते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना कायदा 1952, कर्मचारी ठेव लिंक्ड विमा योजना कायदा 1976 आणि कर्मचारी निवृत्तीवेतन योजना कायदा 1995. यांमार्फत कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या मासिक पगाराचा काही भाग हा EPFO च्या योजनात गुंतवला जातो. जेव्हा कर्मचारी कंपनी सोडून जातो किंवा त्याला पैशांची गरज निर्माण होते. तेव्हा त्याला व्याजासह सर्व रक्कम परत मिळते. तसेच EPFO वर जमा झालेले व्याज करमुक्त आहे. सध्या सध्या, EPF ठेवींवरील व्याज दर 8.10% इतके आहे.

EPF योजनेत सामील होण्यासाठी पात्रता निकष –

  • 15 हजार रुपयांपेक्षा कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना EPF खात्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.
  • 20 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत असल्यास संस्थांना कायद्यानुसार EPF योजनेसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे.
  • 20 पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या संस्था देखील स्वेच्छेने EPF योजनेत सामील होऊ शकतात.
  • 15 हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन असलेले कर्मचारी देखील EPF खात्यासाठी नोंदणी करू शकतात परंतु त्यांना सहाय्यक PF आयुक्तांकडून मान्यता घेणे आवश्यक असते.
  • जम्मू आणि काश्मीर राज्य वगळता संपूर्ण भारताला EPF योजनेतील तरतुदींचा लाभ मिळू शकतो.

EPF शिल्लक कशी तपासायची?

चार पद्धती आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमची EPF शिल्लक तपासू शकता :

EPFO पोर्टल वापरणे – EPFO पोर्टलद्वारे तुम्ही तुमची EPF शिल्लक तपासू शकता. यासाठी तुम्हाला EPFO पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून EPF लॉगिन करावे. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमची माहिती दिसेल.

UMANG अॅप – तुम्ही UMANG अॅप मोबाईल मध्ये ​​डाउनलोड करून देखी आपली EPF शिल्लक तपासू शकता.

मिस्ड कॉल सेवा वापरणे – तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरवरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुमची EPF शिल्लक तपासणे शक्य आहे.

SMS सेवा वापरणे – तुमचा UAN सक्रिय असल्यास, तुम्ही EPF शिल्लक तपासण्यासाठी 7738299899 वर SMS पाठवू शकता.

UAN नंबर म्हणजे काय?

EPFO मार्फत अकाउंट उघडल्यावर कर्मचाऱ्याला सदस्य क्रमांक म्हणजे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) मिळतो. म्हणजेच जसं बँकेत अकाउंट उघडल्यावर तुम्हाला अकाउंट नंबर मिळतो तसंच EPFO मार्फत अकाउंट उघडल्यावर 12 अंकी UAN नंबर मिळतो. EPF चे सर्व व्यवहार या UAN नंबर मार्फत होतात. तथापि, ऑनलाइन सेवा वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांचा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे.

एकाहून अधिक UAN टाळा –

जेव्हा तुम्ही सध्याची कंपनी सोडून दुसऱ्या नवीन कंपनीमध्ये जॉईन होता त्यावेळी त्यांच्याकडे ‘फॉर्म 11’ची मागणी करा. जेणेकरून तुमचा जुनाच UAN कायम राहतो आणि नव्या कंपनीच्या पीएफ खात्याला तुमचा आधीच UAN नंबर जोडला जातो.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...