Food Startup Business : बडे से बडा व्यवसाय… पैसे से नहीं, एक बडे आयडिया से बडा होता है.
आयडिया मग कोणतीही असो त्यासाठी त्या आयडियावर काम करून अमलात आणले तरच एखादा व्यवसाय उभा राहू शकतो.
कोव्हीड काळात अनेक जण घरबसल्या केक करायला लागले. अगदी कुकरमध्ये, ओव्हनमध्ये तर थेट चुलीवरील केक सुद्धा फेमस झाला.
पण थोडा सिरियसली विचार केल्यास आणि नीट नियोजन केल्यास हा व्यवसाय केक पासून इतर बेकरी पदार्थांपर्यंत फोफावू शकतो.
केक किंवा बेकरी ऊत्पादन व्यवसाय सुरू करणे हा एक रोमांचक आणि फायद्याचा असा व्यवसाय असू शकतो.
Food Startup Business : खालील गोष्टी केल्यास तो मोठा होण्याचे चान्सेस तयार होतात –
Food Startup Business : व्यवसाय योजना विकसित करा
कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एक ठोस योजना तयार करणे अत्यंत आवश्यक आहे.
यामध्ये प्रॉडक्टचे टार्गेट मार्केट, उत्पादनाच्या किमतीची रणनीती, मार्केटिंग प्लॅन आणि आर्थिक अंदाज याविषयी सर्व छोट्या मोठ्या तपशीलांचा समावेश असावा.
व्यवसाय योजना तयार करण्यात मदत एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. तसेच ह्यासाठी इंटरनेटवर बराच रिसर्च तुम्ही करू शकता.
तुमच्या प्रॉडक्टच्या मार्केटसंदर्भात रिसर्च करा :
तुमच्या भागातील केकची किंवा तत्सम बेकारी प्रॉडक्टची मागणी निश्चित करण्यासाठी (Demand Analysis) मार्केट रिसर्च करा.
सध्याची स्पर्धा पहा आणि स्पर्धक काय ऑफर करत आहेत आणि कोणत्या किंमतींवर ते पहा.
ही माहिती तुम्हाला तुमचा युनिक सेलिंग प्रपोझिशन (USP) निर्धारित करण्यात मदत करेल आणि त्यामुळे तुमची उत्पादने मार्केटपेक्षा वेगळे ठरेल.
हेही वाचा : भारत सरकारची 5 लाखांची आरोग्य योजना; नेमकी काय आहे ही योजना? जाणून घ्या.
आवश्यक परवानग्या आणि परवाने मिळवा :
तुमचा व्यवसाय कायदेशीररित्या चालवण्यासाठी तुम्हाला कोणत्या परवानग्या आणि परवाने आवश्यक आहेत हे सर्वात आधी तपासणे आवश्यक आहे. यामध्ये अन्न सेवा परवाना, व्यवसाय परवाना अश्या अनेक बाबींचा समावेश असू शकतो.
ठिकाण निवडा :
तुम्हाला तुमची बेकरी कुठे सेट करायची आहे याचा विचार करा. उत्पादने घरातून विकणार की आणखीन कुठे विक्रीला ठेवणार ह्याचा विचार करा.
रहदारी, पायी चालणारे, आसपास उपलब्ध असणाऱ्या गोष्टी ह्याच्यासारख्या घटकांचा विचार करा.
उपकरणे आणि इतर उत्पादनसंबंधी गोष्टी खरेदी करा :
मिक्सर, ओव्हन, बेकिंग पॅन आणि भांडी यासारख्या मूलभूत बेकिंग उपकरणे तसेच प्रोडक्शन साहित्य, पॅकेजिंग आणि मार्केटिंग मटेरियल ह्युगोष्टी पण आवश्यक असतील.
तुमचा मेनू ठरवा :
केक, बिस्किट्स, पिझ्झा, पेस्ट्री, ब्रेड्स अश्या प्रोडक्टची तुमच्या भागातली डिमांड पाहून मेन्यू ठरवा.
एक ब्रँड तयार करा :
लोगो आणि वेबसाइट आणि बिझनेस कार्ड यासारख्या मार्केटिंग सामग्रीसह तुमच्या व्यवसायासाठी ब्रँड ओळख निर्माण करा.
तुमच्या व्यवसायाचे मार्केटिंग करा :
तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सोशल मीडिया आणि इतर जाहिरात चॅनेल वापरा.
केक आणि बेकरी उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक आहे, परंतु काळजीपूर्वक नियोजन आणि नीट लक्ष दिल्यास, हा एक फायद्याचा व्यवसाय बनू शकतो.