Nomination of Mutual Funds : म्युच्युअल फंड्स सही है.! पण आता तुम्ही एक काम नाही केलं तर कुछ सही नाही है..! म्युच्युअल फंड्समध्ये (Mutual Funds) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूकदारांना नामनिर्देशन भरणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
31 तारखेच्या आत नामनिर्देशन भरणे अनिवार्य –
म्युच्युअल फंड्समध्ये (Mutual Funds) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी 31 तारखेपर्यंत नामनिर्देशन भरणे अनिवार्य आहे, नाहीतर तुमचा म्युच्युअल फंड फोलिओ (Mutual Funds Folio) गोठवला जाऊ शकतो किंवा फ्रीझ केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्ही त्या फोलिओ मार्फत कोणतीही नवी गुंतवणूक करू शकणार नाही. यासंबंधी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) जून 2022 मध्ये परिपत्रक जारी केलं होत. त्यात जुन्या आणि नव्या गुंतवणूकदारांना नामनिर्देशनची (Nomination) प्रक्रिया 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्यास सांगितलं होत. तसेच नॉमिनी (Nominee) भरण्याची तुमची इच्छा नसल्यास स्पष्टपणे नामनिर्देशनाची निवड रद्द करावी असे देखील त्या परिपत्रकात सांगण्यात आलं होत.
सेबीने (SEBI) दिलेल्या माहितीनुसार नामांकन प्रक्रिया फक्त तुमच्या नॉन-डीमॅट म्युच्युअल फंड होल्डिंग्सना लागू होते. ब्रोकरेज खात्याद्वारे केलेल्या म्युच्युअल फंडामधील गुंतवणुकीसाठी, संबंधित नामनिर्देशित व्यक्ती डीमॅट खात्याच्या आधारावर लागू होईल.