Tuesday , 10 December 2024
Home FinGnyan What is Money Laundering? : मनी लाँड्रिंग म्हणजे काय?
FinGnyan

What is Money Laundering? : मनी लाँड्रिंग म्हणजे काय?

What is Money Laundering? : अनेकदा हा शब्द आपल्या वाचनात आलेला असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर अवैध प्रकारे फिरवलेला पैसा. मनी लाँड्रिंग (Money Laundering) म्हणजे बेकायदेशीर उद्योगातून झालेल्या कमाईला कायदेशीर पैसा म्हणून खपविण्याची प्रक्रिया आहे. ही एक अशी गुन्हेगारी पद्धत आहे ज्यामध्ये ‘अनैतिक’ पद्धतीने मिळवलेल्या पैशांचे (म्हणजेच, अंमली पदार्थांची तस्करी, फसवणूक किंवा भ्रष्टाचार यांसारख्या बेकायदेशीर कृतीतून मिळवलेला अफाट पैसा) ‘नैतिक’ कमाईत बदलणे. अशी संपत्ती संशयाविना वापरली जाण्याची पद्धत रूढ होत गेली आहे.

मनी लाँडरिंगमध्ये सामान्यत: प्लेसमेंट, लेयरिंग आणि इंटिग्रेशन (एकत्रीकरण) यासह अनेक टप्पे समाविष्ट असतात.

प्लेसमेंट स्टेज – ह्यामध्ये बेकायदेशीर पद्धतीने कमावलेला पैसा नियमित आर्थिक व्यवस्थेत आणला जातो.

लेयरिंग स्टेज – ह्यामध्ये अश्या पैश्याचे मूळ आणि मालकी लपवण्यासाठी अत्यंत क्लिष्ट आणि जटील आर्थिक व्यवहारांचा वापर करून पैसे फिरवले जातात.

इंटिग्रेशन स्टेज – ह्यामध्ये लेयरिंग स्टेजमध्ये फिरवलेला पैसा नियमित अर्थव्यवस्थेत पुन्हा आणला जातो आणि त्यातून नवीन गुंतवणूक, मालमत्ता खरेदी, लक्झरी वस्तूंची खरेदी किंवा बाकी आर्थिक व्यवहार केले जातात. ज्यातून बेकायदेशीर मार्गे मिळवलेला पैसा पुनःश्च व्यवहारात येऊन नैतिक म्हणजे ब्लॅक टू व्हाईट स्वरूप धारण करतो.

परंतु मनी लाँड्रिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये महत्त्वपूर्ण दंड आणि तुरुंगवास समाविष्ट आहे. अश्या गोष्टीचा देशाच्या आर्थिक यंत्रणेवर एकात्मतेवर आणि व्यापक अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक परिणाम होतो. कारण असा पैसा गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी चालू ठेवण्यास बळ देते. भारतात आणि इतरही देशात अश्या अवैध मार्गे कमावलेल्या संपत्तीवर सातत्याने लक्ष ठेवणे सुरु आहे आणि कारवाई सुरु असते. परंतु दुर्दैवाने लागेबांधे आणि कमजोर यंत्रणा ह्यामुळे अशी व्यवस्था मोडून काढणे सध्यातरी कठीण आहे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...