Tuesday , 9 April 2024
Home Investment Financial Rules Changing From 1st April : नवीन आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल पासून हे महत्वाचे बदल होणार.
Investment

Financial Rules Changing From 1st April : नवीन आर्थिक वर्षात म्हणजे 1 एप्रिल पासून हे महत्वाचे बदल होणार.

Financial Rules Changing From 1st April : आजपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झालं आहे. बदलत्या काळानुसार 1 एप्रिल पासून म्हणजेच आजपासून काही नियमांत देखील महत्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर होणार आहे. 1 एप्रिल पासून नेमक्या कोणत्या गोष्टी बदलणार आहेत? जाणून घेऊयात…

आजपासून ‘हे’ नियम बदलणार –

एलपीजी गॅस आणि सीएनजीच्या किमतीत बदल होऊ शकतो :

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस आणि सीएनजीच्या किमतीत बदल करून नवीन किमती जाहीर करत असतात. त्यानुसार 1 तारखेला व्यावसायिक तसेच घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढतील की कमी होतील याकडे सर्वांचं लागलं आहे.

सोन्याच्या विक्रीच्या नियमांत बदल :

सोन्याच्या विक्रीच्या नियमांत एक तारखेपासून महत्वाचा बदल होणार आहे. आता नवीन नियमांनुसार 4 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असलेल्या दागिन्यांच्या विक्रीवर आता बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी ज्वेलर्स आता 6 अंकी HUID नंबर असलेल्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री करू शकणार आहेत. तसेच जुने ग्राहक त्यांच्याकडे असलेलं जुने सोन्याचे दागिने हे हॉलमार्किंगशिवाय विकू शकतील.

वाहनांच्या किमती वाढणार :

वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमती आणि भारतात सुरु झालेल्या बीएस-6 च्या दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीमुळे वाहन निर्मात्या कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. हा खर्च भरून काढण्यासाठी अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांनी एक एप्रिलपासून वाहनांच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मारुती सुझुकी (Maruti Suzuki), टाटा मोटर्स (Tata Motors), मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz), बीएमडब्ल्यू (BMW), टोयोटा (Toyota) आणि ऑडी (Audi) अशा अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच वाहनांची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

‘या’ विमा पॉलिसींवर टॅक्स भरावा लागणार :

एक एप्रिलपासून वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींतून मिळणाऱ्या इन्कमवर आता टॅक्स भरावा लागणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणा केली होती. ह्याची अंबलबजावणी एक एप्रिलपासून होणार आहे.

डिमॅट खात्यात नामांकन आवश्यक :

शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना हा नियम माहिती आवश्यक आहे. सेबीच्या नवीन नियमांनुसार एक एप्रिलच्या आधी डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याला नॉमिनीचे नामांकन जोडणे आवश्यक आहे. असं न केल्यास एक एप्रिल नंतर तुमचं डिमॅट अकाउंट फ्रीझ केलं जाऊ शकत.

म्युच्युअल फंडामध्ये नॉमिनी आवश्यक :

डिमॅट अकाउंट प्रमाणेच सेबीने ‘म्युच्युअल फंड’ मध्ये गुंतवणूक करण्याऱ्या गुंतवणूकदारांना 31 मार्च पर्यंत नॉमिनी निश्चित करण्याचे आदेश दिले होते. असं न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून त्यांचा पोर्टफोलिओ गोठवण्यात येणार आहे.

NSE वरील व्यवहार शुल्क वाढ मागे :

1 एप्रिलपासून नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) कॅश इक्विटी आणि फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेगमेंटमधील कोणत्याही प्रकारच्या व्यवहारांवर आकारले 6 टक्के शुल्क मागे घेतले जाणार आहे.

Related Articles

Post Office Monthly Income Scheme : पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना – बचत करण्याचा एक खात्रीशीर पर्याय

Post Office Monthly Income Scheme : कमी जोखमीच्या पर्यायांमध्ये केलेली गुंतवणूक केव्हाही...

Farm Didi Food Tech Startup : महिला उद्योजक मंजरी शर्मा यांचा ‘फार्म दीदी’ फूड-टेक स्टार्टअप

Farm Didi Food Tech Startup : बचत गटातल्या महिलांना हाताशी धरून त्यांनी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Benefit of Piggy Bank : Piggy Bank चा फायदा काय होतो?

Benefit of Piggy Bank : पिग्गी बँका पैसे वाचवण्याचा एक पारंपारिक मार्ग...