Saturday , 14 September 2024
Home FinGnyan Important Financial Scams in India : भारतातले काही महत्वाचे आर्थिक घोटाळे
FinGnyan

Important Financial Scams in India : भारतातले काही महत्वाचे आर्थिक घोटाळे

Finntalk

Important Financial Scams in India : आर्थिक घोटाळे दुर्दैवाने भारतात अनेकदा घडले आहेत. खरेतर अश्या घोटाळ्यांचा जनतेवर आणि अर्थव्यवस्थेवर घातक परिणाम होऊ शकतो.

Important Financial Scams in India : Finntalk.in

भारतात झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांची काही उदाहरणे :

1) हर्षद मेहता घोटाळा :

हर्षद मेहता हा एक स्टॉक ब्रोकर होता, ज्याने 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस स्टॉक मार्केटमध्ये फेरफार केला होता. त्याने बेकायदेशीरपणे निधी मिळविण्यासाठी, बँकेच्या पावत्या वापरल्या आणि नंतर त्या निधीचा वापर स्टॉक खरेदी करण्यासाठी केला. त्यामुळे त्या स्टॉकच्या किंमती गगनाला भिडल्या. अखेर हा घोटाळा उघड झाला. हर्षद मेहताला 1992 मध्ये अटक करण्यात आली. नुकतीच ह्या विषयावर एक वेबसिरीज चांगलीच फेमस झाली आहे.

2) सत्यम घोटाळा :

सत्यम कॉम्प्युटर सर्व्हिसेस ही एक सॉफ्टवेअर कंपनी होती. कंपनीच्या अकाउंट्समध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करून, कंपनीचा अवाजवी नफा आणि महसूल वाढवला गेला. कंपनीचे संस्थापक रामलिंगा राजू यांनी ह्या सगळ्यात मोठी भूमिका निभावली. त्यामुळे कंपनीचा नफा होता त्यापेक्षा अधिक फायदेशीर दिसला. आणि गुंतवणूकदार आकर्षित झाले. फसवणूक उघडकीस आल्यावर, कंपनीच्या शेअरची किंमत घसरली. काही काळाने रामलिंग राजूला अटक करण्यात आली.

3) शारदा घोटाळा :

शारदा ग्रुप ही एक चिट फंड कंपनी होती. गुंतवणूकदारांना 50% पेक्षा जास्त उच्च परतावा देण्याचे वचन दिले होते. गुंतवणुकीपेक्षा जास्त पैसे मिळतील, ह्या आशेने अनेकांनी आपली सर्व पुंजी ह्या चिटफंड मध्ये लावलेली. अर्थात कंपनीवर कुठल्याच प्रकारचे नियमन नसल्याने, ती 2013 मध्ये अखेरीस कोसळली. हजारो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. काहींनी आत्महत्या केली. कंपनीशी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली.

4) पीएनबी घोटाळा :

पंजाब नॅशनल बँकेच्या कर्मचार्‍यांनी, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या मालकीच्या कंपन्यांना, फसवे क्रेडिट पत्र जारी केले होते. सुमारे 11500 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे नंतर लक्षात आले. 2018 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला, तोवर निरव मोदी आणि मेहुल चोक्सी देश सोडून पळून गेले. पीएनबीच्या अनेक कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.

5) IMA घोटाळा :

I Monetary Advisory (IMA) ही एक सोन्याची पॉन्झी योजना होती जी गुंतवणूकदारांना 35 ते 65 टक्के परतावा देण्याची हमी देत होती. जवळपास 1300 कोटी रुपयांचा हा scam होता. 40000 लोकांचे ह्यात नुकसान झाल्याची नोंद आहे. ही देखील कंपनी अनियंत्रित होती, आणि अखेरीस ती 2019 मध्ये कोसळली, ज्यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे नुकसान झाले. कंपनीचा संस्थापक मोहम्मद मन्सूर खान देश सोडून पळून गेला.

दिवसेंदिवस आर्थिक घोटाळे आणि त्यांचे स्वरूप बदलत चालले आहे. आर्थिक घोटाळ्यांच्या जोखमींबद्दल जागरुक राहणे आणि गुंतवणूक करण्यापूर्वी प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा होणे देखील महत्त्वाचे आहे.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...