UPI Payment : उद्यापासून म्हणजेच 1 एप्रिल 2023 पासून UPI द्वारे व्यवहार कारण महागणार आहे. अर्थ संकल्पाच्या वेळेस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबद्दल माहिती दिली होती. त्यानुसार 1 एप्रिलपासून UPI द्वारे केल्या जाणाऱ्या 2000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामुळे उद्यापासून UPI द्वारे पेमेंट कारण महागणार आहे. पण यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. UPI द्वारे व्यवहार करणं नेमकं कोणासाठी महागणार आहे? किंवा UPI द्वारे व्यवहार केल्यावर लागणारे अतिरिक्त शुल्क कोणाला भरावे लागणार आहे? ह्याबाबत शंका-कुशंका निर्माण झाल्या आहेत. चिंता करू नका याचा सर्वसामान्य ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणजेच UPI-To-UPI किंवा पर्सन-टू-पर्सन अशा कोणत्याच व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. मग हे अतिरिक्त शुल्क कोणाकडून आकारण्यात येईल? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आपल्या परिपत्रकात नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊयात….
शुल्काची आकारणी कशी होणार?
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलं आहे की प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) मार्फत होणाऱ्या मर्चंट व्यवहारांवर (Merchant Transaction) हे शुल्क लागू होणार आहे. म्हणजेच डिजिटल पेमेंट वॉलेट मार्फत होणारे व्यवहार जसं कि, पेटीएम वॉलेट (Paytm Wallet), फोनपे वॉलेट (PhonePay Wallet) ह्यांमार्फात होणाऱ्या UPI व्यवहारांवर 1.1 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही दुकानातून एखादी वस्तू विकत घेतली. पेमेंट करण्यासाठी तुम्ही त्यांचा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन केला. UPI पेमेंट करताना पैसे बँकेतून ट्रान्सफर करण्याऐवजी डिजिटल वॉलेट म्हणजेच पेटीएम वॉलेट किंवा फोनपे वॉलेट यांसारख्या वॉलेटमधून पेमेंट केलं तर तुम्हला 1.1 टक्के चार्ज लागणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर डिजिटल वॉलेटमार्फत 2000 हजारांपेक्षा जास्त पेमेंट केल्यावरचं 1.1 टक्के चार्ज लागणार आहे.
…तर कोणतेही चार्जेस नाही –
NPCI ने आपल्या परिपत्रकात स्पष्ट केलं आहे की, युपीआयद्वारे केल्या जाणाऱ्या बँक-टू-बँक व्यवहारांवर कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाही. ही सेवा आधीसारखीच विनामूल्य असणार आहे. त्यामुळे या बदलाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी UPI पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले राहिल.