Bank Holidays in April : बँकांचे सर्व व्यवहार ऑनलाईन झाले असले तरीही काही कामे करण्यासाठी आपल्याला बँकेतच जावं लागत. त्यासाठी आपण आपल्या कामातील काहीसा वेळ बँकेच्या कामासाठी राखून ठेवतो. पण कधी कधी बँक बंद असली कि आपला हिरमोड होतो, त्यासाठी बँक कधी बंद आहे आणि कधी नाही याची माहिती असणं आवश्यक आहे. ह्याची माहिती असली कि आपण राखून ठेवलेल्या वेळेचा सदुपयोग होतो तसेच आपल्या इतर कामाचं देखील नियोजन करता येत.
एप्रिल महिन्यात कोणकोणत्या दिवशी बँका असणार बंद?
येणाऱ्या एप्रिल (April 2023) महिन्यात बँका किती दिवस आणि कोणत्या वारी बंद असणार आहे याबाबत रिझर्व्ह बँकेने (RBI) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध केली आहे. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार एप्रिल महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार राज्य आणि तिथल्या स्थानिक सणांनुसार या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.
एप्रिल महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी :
- 1 एप्रिल : वार्षिक मेंटेनन्ससाठी बँका बंद राहतील.
- 2 एप्रिल : रविवार
- 4 एप्रिल : महावीर जयंती
- 5 एप्रिल : बाबू जगजीवन राम जयंतीनिमित्त तेलंगणा राज्यातील बँका बंद राहतील.
- 7 एप्रिल : गुड फ्रायडे
- 8 एप्रिल : दुसरा शनिवार
- 9 एप्रिल : रविवार
- 14 एप्रिल : बाबासाहेब आंबेडकर जयंती
- 15 एप्रिल : आगरतळा, गुवाहाटी, कोची, कोलकाता, शिमला आणि तिरुअनंतपुरममध्ये विशू, बोहाग बिहू, हिमाचल डे, बंगाली नववर्षामुळे बँका बंद राहतील.
- 16 एप्रिल : रविवार
- 18 एप्रिल : जम्मू आणि श्रीनगरमध्ये शब-ए-कद्र रोजी बँका बंद राहतील.
- 21 एप्रिल : ईद-उल-फित्रमुळे आगरतळा, जम्मू, कोची, श्रीनगर आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
- 22 एप्रिल : शनिवार (चौथा शनिवार)
- 23 एप्रिल : रविवार
- 30 एप्रिल : रविवार
वरील सर्व सुट्ट्या आरबीआय निर्देशित आहेत. तसेच या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक सण-उत्सवांनुसार आहेत. त्यामुळे काही सुट्ट्या संपूर्ण देशासाठी लागू नसून विशेष भागापुरत्या मर्यादित आहेत. सुट्ट्यांमध्येही बँकेच्या ऑनलाईन सुविधांचा लाभ घेऊ शकता. तसेच तुम्हाला बँकेत काही काम असल्यास तुम्ही वरील माहितीचा आधार घेऊन योग्य ते नियोजन करू शकता.