Saturday , 27 July 2024
Home FinGnyan How to Start Business? : व्यवसाय पहावा करून…
FinGnyan

How to Start Business? : व्यवसाय पहावा करून…

How to Start Business?
How to Start Business? : Finntalk

How to Start Business? : बिझनेस सिस्टीम सेट-अप करण्यामध्ये अनेक टप्प्यांचा समावेश होतो. व्यवसाय सुरळीत आणि कार्यक्षम पातळीवर चालू राहावा ह्यासाठी ह्या गोष्टी पाळणे आवश्यक आहे.

How to Start Business? व्यवसाय सुरु करताना खालील काही गोष्टी माहित करून घेणं आवश्यक आहे –

व्यवसायाची उद्दिष्टे लिहून काढा : तुमचा व्यवसाय काय प्रकारातला आहे आणि तुम्हाला हा व्यवसाय करून काय साध्य करायचे आहे लिहून काढा.

असे लिहून काढल्याने काम करताना बऱ्यापैकी सहजता येते.

व्यवसाय योजना विकसित करा : व्यवसाय करण्यासाठीच्या स्ट्रॅटेजी म्हणजे रणनीती, उद्दिष्टये, बाजारपेठ, स्पर्धा, बजेट, लागणारे लेबर, कच्चा माल वगैरे अश्या गोष्टींना अनुसरून एक सर्वसमावेशक व्यवसाय योजना तयार करावी.

ह्याला व्यवसायाची ब्लूप्रिंट म्हणता येईल.

व्यवसायाची रचना निश्चित करा : अत्यंत महत्वाची अशी ही बाब आहे. व्यवसायासाठीची कायदेशीर रचना ठरवावी,

हेही वाचा : Government School Recruitment 2023 : सरकारच्या ‘या’ शाळांमध्ये 4 हजार 062 जागांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज.

मग ती एकल मालकी म्हणजे OPC-one person company, भागीदारी म्हणजे पार्टनरशिप, मर्यादित दायित्व कंपनी (LLP) किंवा प्रायव्हेट लिमिटेड कम्पनी अश्या कोणत्या प्रकारात आपल्याला काम करायचे आहे हे ठरवून मग त्या अनुषंगाने नोंदणी करावी.

व्यवसाय ऑपरेशन्स सेट करा : उपकरणे, कर्मचारी आणि तंत्रज्ञानासह व्यवसायाला आवश्यक असलेली संसाधने ओळखून, व्यवसायाची कार्यप्रणाली निश्चित केल्यास फायदेशीर होते.

सुरुवातीलाच जर कार्यपद्धती आणि धोरणे विकसित केली तर ती व्यवसायाला एका निश्चित प्रकारात काम करण्यास मदत होते.

अकौंटिंग यंत्रणा निश्चित करावी : जमा खर्च तसेच खर्चाच्या पद्धती ह्यावर शिस्तबद्ध काम करण्यासाठी अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरणे योग्य आणि ह्यामध्ये मदत करण्यासाठी अकाउंटंटची नियुक्ती करणे श्रेयस्कर.

मार्केटिंगचा प्लॅन तयार करा : मार्केटिंगचे दोन प्लॅन तयार करा. एक शॉर्ट टर्म आणि एक लॉन्ग टर्म.

व्यवसायाची बाजारपेठ, प्रचारात्मक धोरणे आणि जाहिरात पद्धती ह्यावर नीट विचार करा.

एखादा ह्या क्षेत्रातला तज्ज्ञ सोबत घ्या किंवा त्यांची मदत व्यावसायिक पातळीवर घ्यावी.

कागदोपत्री रेडी व्हा : कागदपत्रांच्या पातळीवर आधी पूर्णपणे तयार होणे आवश्यक असते.

व्यवसायाची नोंदणी करणे, आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवणे आणि कर कायद्यांचे पालन करणे ह्यासोबतच बँकिंगसाठीच्या गोष्टीची पूर्तता करणे अत्यावश्यक असते.

एकंदरीत, बिझनेसच्या स्थापनेसाठी काळजीपूर्वक नियोजन आवश्यक आहे. आपण आपल्या व्यवसायासाठी मजबूत पायाभरणी करून आपल्या यशाची शक्यता वाढवू शकता.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...