What Is Loan? : ‘तुमची पैश्यांची गरज आम्ही भागवू’ अश्या आकर्षक शब्दात असणाऱ्या जाहिराती आजकाल आपल्या आजूबाजूला दिसतात. बँक (Bank), पतसंस्था (Credit Institution), वेगवेगळ्या कर्ज वितरण करणाऱ्या आर्थिकसंस्था (Financial Institutions) ह्यांच्या जाहिराती रोजच वर्तमानपत्रे, टीव्ही, अगदी सगळ्याच सोशल मीडियावर दिसतात.
लोन-कर्ज म्हणजे काय?
“मुख्यत्वे करून विशिष्ट कालावधीत/ मुदतीत परताव्याच्या Repayment वचनासह घेतलेले पैसे म्हणजे कर्ज.”
कर्ज देणारी यंत्रणा निश्चित व्याजदर Interest ठरवते. मूळ मुद्दल रकमेसह व्याजासहित कर्जफेड करावी लागते. भारतात विविध प्रकारात कर्ज उपलब्ध आहेत आणि त्यांचा वापर ज्या उद्देशासाठी केला जातो त्यानुसार त्यांचे दोन घटकांमध्ये वर्गीकरण केले जाते.
1) पहिला प्रकार – सुरक्षित कर्ज (Secured Loan)
2) दुसरा प्रकार – असुरक्षित कर्ज (Unsecured Loan)
सुरक्षित कर्ज – Secured Loan
ज्या कर्जांना तारण आवश्यक असतं, अशी कर्ज ह्या कॅटेगरीत येतात. कर्ज देणाऱ्याकडे कर्ज घेत असलेल्या पैशाची सुरक्षितता म्हणून एखादी मालमत्ता गहाण ठेवता तेंव्हा अश्या प्रकारच्या मिळणाऱ्या कर्जांना Secured Loan सुरक्षित कर्ज म्हणता येते. जर कर्जाची परतफेड होऊ शकत नसेल, तर कर्ज देणार्याकडे त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी अशी तारण असलेली प्रॉपर्टी विकून त्यांना लोन रिकव्हर करण्याचा मार्ग असतो. ह्या प्रकारातल्या कर्जाचे व्याजदर हे तुलनेने इतर कर्ज प्रकारापेक्षा कमी असतात.
असुरक्षित कर्ज – Unsecured Loan
विनातारण मिळणारी कर्ज ह्या प्रकारात मोडतात. मात्र अशी कर्जे ज्यादा व्याजदराने मिळतात.
High Risk कॅटेगरीमध्ये ही कर्जे येतात. म्हणून त्यांचा व्याजदर जास्त असतो. उत्तम क्रेडिट हिस्ट्री असणाऱ्याला अशी कर्जे सहजी मिळू शकतात.
पुढील भागात सुरक्षित आणि असुरक्षित ह्या प्रकारात कोणकोणती कर्ज येतात ह्याबद्दल माहिती वाचूयात.