Saturday , 20 July 2024
Home FinGnyan What is insurance : इन्शुरन्स – विमा म्हणजे काय? जाणून घ्या इन्शुरन्सचा इतिहास.
FinGnyan

What is insurance : इन्शुरन्स – विमा म्हणजे काय? जाणून घ्या इन्शुरन्सचा इतिहास.

What is insurance : अभिनेत्रीने घेतला तिच्या नाकाचा विमा, उद्योगपतीने घेतला कुत्र्याच्या शेपटीचा विमा वगैरे अशा अनेक गमतीदार बातम्या आपण अनेकदा ऐकतो. विमा…इन्शुरन्स थोडेसे इन्शुरन्सविषयी जाणून घेऊयात. जनरल नॉलेज असणे नक्कीच फायद्याचे ठरते.

What is insurance : इन्शुरन्स – विमा म्हणजे काय?

अगदी शास्त्रीय व्याख्या सांगायची झाल्यास (Risk Management) जोखीम व्यवस्थापन म्हणजे Insurance विमा. भारतातील इन्शुरन्सची कथा साधारण 1800 च्या दरम्यान सुरू झाली. विदेशी इन्शुरन्स कंपन्यांनी सागरी विमा ह्या प्रकारात व्यवसाय सुरू केला. ज्यामुळे

भारतातील इन्शुरन्सच्या आधुनिक इतिहासाची सुरुवात झाली.

अमेरिकेमध्ये जीवन विम्याची विक्री 1760च्या उत्तरार्धात सुरू झाली.भारतात, सध्याच्या स्वरूपात विम्याचा इतिहास 1818 चा आहे. अनिता भावसार यांनी युरोपीय समुदायाच्या गरजा भागवण्यासाठी कोलकाता येथे ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी सुरू केली.

भारतातल्या इन्शुरन्सच्या इतिहासातील काही महत्वाचे टप्पे :

1818 : भारतातील पहिल्या विमा कंपनीचा जन्म 1818 मध्ये झाला. विमा कंपनीचे नाव होते, Oriental Life इन्शुरन्स. ही कंपनी नंतर काही कारणाने बंद झाली अन नंतर काही वर्षांनी पुन्हा ऑपरेशनल झाली.

1870 : बॉम्बे म्युच्युअल लाइफ इन्शुरन्स सोसायटी स्थापन झालेली पहिली भारतीय विमा कंपनी बनली.

1907 : इंडियन मर्कंटाइल इन्शुरन्स लि.ची स्थापना. सामान्य विमा म्हणजे जनरल इन्शुरन्स व्यवसायातील सर्व वर्गांचे व्यवहार करणारी पहिली कंपनी.

1912 : भारतीय जीवन विमा कंपनी कायदा सुरू झाला. हा कायदा देशातील लाईफ इन्शुरन्सच्या व्यवसायाचे नियमन करतो, म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवतो.

1938 : विमाधारक लोकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने आधीच्या असलेल्या विमा कायद्यात सुधारणा करण्यात आली.

1972 : देशात नॉन-लाइफ इन्शुरन्सचे राष्ट्रीयीकरण झाले. म्हणजे बिगर आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाले. 107 विमाधारक एकत्र करून चार कंपन्यांमध्ये त्याना गटबद्ध केले. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लि., ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. ह्यांची जीआयसी म्हणजे जनरल इन्शुरन्स कंपनी अशी एक कंपनी म्हणून समाविष्ट केली.

भारतात सध्या एकूण 57 विमा कंपन्या कार्यरत आहेत. आयुर्विमा व्यवसायासाठी 24 कंपन्या IRDA द्वारे मान्यताप्राप्त आहेत, त्याचप्रमाणे नॉन-लाइफ इन्शुरन्ससाठी 34 कंपन्यांना IRDA कडून मान्यता मिळाली आहे. आयुर्विमा (Life Insurance) प्रकारात LIC (लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.

भारतात विम्याचे खालील मुख्यप्रकार आहेत :

  • आगीचा विमा
  • आयुर्विमा
  • आरोग्य विमा
  • वाहन विमा
  • अपघात विमा

इन्शुरन्स ही आग्रहविषयक वस्तू आहे. तरी अत्यंत महत्वाची आहे. वेळ सांगून येत नसते. म्हणून योग्य तो इन्शुरन्स वेळीच करून घेणे अत्यावश्यक.

Related Articles

A Rise of Bata Footwear : बाटा फुटवेअरचा उल्लेखनीय उदय.

A Rise of Bata Footwear : एका शतकापूर्वीच्या सुरुवातीपासून ते आजच्या जागतिक...

Wipro Industries Soaring to New Heights : विप्रो इंडस्ट्रीजची यशोगाथा

Wipro Industries Soaring to New Heights : जागतिक तंत्रज्ञान आणि वाढत्या गतिमान...

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची एक यशोगाथा

The Remarkable Rise of Adani Industries : अदानी इंडस्ट्रीजची सुरुवात कशी झाली?...