Concepts of Finance : फायनान्स सेक्टरमधल्या तीन महत्वाच्या संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. आर्थिक क्षेत्रातल्या ३ महत्वाच्या टॉपिक्सवर आपण सजग असणे आवश्यक आहे.
- (Personal Finance) पर्सनल फायनान्स
- (Public Finance) पब्लिक फायनान्स
- (Corporate Finance) कॉर्पोरेट फायनान्स
Concepts of Finance : पर्सनल फायनान्स (Personal Finance)
पर्सनल फायनान्स म्हणजे उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक आणि कर्ज ह्यांसह एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक गोष्टींचे नियोजन करणे.
कर्जफेड, रिटायरमेंट नंतरचाय आयुष्यासाठी बचत करणे किंवा घर खरेदी करणे यासारखी व्यक्तिगत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अर्थनियोजन करणे तसेच वैयक्तिक गरजा सातत्याने पूर्ण होत राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे फायनान्शिअल गोष्टीवर काम करणे ह्या बाबींचा अंतर्भाव होतो.
पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट हे एखाद्या व्यक्तीला आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्यास, संपत्ती निर्माण करण्यास आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करू शकते.
Concepts of Finance : पब्लिक फायनान्स (Public Finance) :
पब्लिक फायनान्स ही अर्थव्यवस्थेतील सरकारची भूमिका आणि निधी उभारण्यासाठी आणि खर्च करण्यासाठी वापरलेल्या पद्धतींचा अभ्यास करते.
त्यात सरकारचे आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महसूल, खर्च आणि कर्ज यांचे व्यवस्थापन समाविष्ट आहे.
अर्थव्यवस्थेतील सरकारच्या भूमिकेशी संबंधित असणाऱ्या कर, शुल्क आणि इतर स्त्रोतांद्वारे महसूल कसा वाढतो आणि आलेला महसूल निधी आरोग्यसेवा, शिक्षण, संरक्षण, पायाभूत सुविधा आणि समाजकल्याण यासारख्या विविध सार्वजनिक बाबींसाठी कसा वाटप केला जातो? ह्यावर काम करणारी व्यवस्था म्हणजे पब्लिक फायनान्स.
पब्लिक फायनान्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेचा एक आवश्यक पैलू आहे, कारण प्राप्त होणाऱ्या निधीचे कार्यक्षम वाटप आणि अत्यावश्यक सार्वजनिक गोष्टी आणि सेवांची तरतूद सुनिश्चित करण्यात मदत करते.
शासनाचे आर्थिक स्थैर्य सुनिश्चित करण्यात आणि दीर्घकालीन वाढ तसेच विकासाला चालना देण्यातही ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
हेही वाचा : भारतातील फायनान्स विषयावरील वृत्तपत्रे
कॉर्पोरेट फायनान्स (Corporate Finance) :
कॉर्पोरेट फायनान्स ही फायनशील शाखा बिझनेसेसच्या आर्थिक व्यवस्थापनाशी संबंधित आहे.
ह्यात कंपनीच्या एकूण मूल्यावर परिणाम करणारे आर्थिक निर्णयांचे विश्लेषण करणे समाविष्ट आहे.
कॉर्पोरेट फायनान्सच्या गोष्टींमध्ये आर्थिक नियोजन, भांडवली अंदाजपत्रक, गुंतवणूक विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन आणि निधी व्यवस्थापन यांचा समावेश होतो.
बहुतेक वेळा शेअरहोल्डरचे मूल्य वाढवण्याच्या उद्देशाने ह्या सेक्टरमध्ये निर्णय घेतले जातात.
नफा वाढवणे, खर्च कमी करणे आणि ऑपरेशनल गोष्टी सुधारणे यासारख्या विविध धोरणांद्वारे साध्य केले जातात.