Wednesday , 4 October 2023
Home FinGnyan Net banking password security : नेटबँकिंग पासवर्ड आणि त्याची सुरक्षितता
FinGnyan

Net banking password security : नेटबँकिंग पासवर्ड आणि त्याची सुरक्षितता

Net banking password security

Net banking password security : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आजकाल चांगेलच वाढायला लागले आहे.
आपल्या बँक खात्याच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड जितका स्ट्रॉंग तितका तो क्रॅक करणे कठीण. संभाव्य सायबर धोक्यांपासून आपला ऑनलाइन आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत आणि सुरक्षित नेट बँकिंग पासवर्ड सेट करणे महत्त्वाचे आहे.

#Net banking password security : https://finntalk.in/

चांगला नेट बँकिंग पासवर्ड सेट करण्याच्या काही टिप्स : Net banking password security

अपरकेस आणि लोअरकेस अक्षरे, संख्या म्हणजे आकडे आणि विशेष अक्षरांचे एकत्रित मिश्रण आवश्यक :
स्ट्रॉंग पासवर्डमध्ये अप्परकेस आणि लोअरकेस अक्षरं, आकडा आणि !, @, #, इ. सारख्या विशेष वर्णांचे मिश्रण असावे. पासवर्डचा अंदाज लावण्यासाठी किंवा क्रॅक करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला एवढे कॉम्बिनेशन करून पासवर्ड क्रॅक करणे अवघड बनते.

हेही : खासगी कंपनीतून सॅलरी घेणाऱ्या प्रत्येकाला ‘हे’ पाच नियम माहित असायला हवे!

पासवर्ड मध्ये वैयक्तिक माहिती वापरणे टाळा :

तुमच्या पासवर्डचा भाग म्हणून तुमचे नाव, जन्मतारीख किंवा फोन नंबर यासारखी वैयक्तिक माहिती वापरू नका. सायबर गुन्हेगार अशा माहितीचा सहज अंदाज लावू शकतात.

पासवर्डची लांबी :

मोठ्या लांबीचा पासवर्ड साधारणपणे अधिक सुरक्षित असतो. किमान 10-15 अक्षरांचे पासवर्ड ठेवल्यास उत्तम.

सामान्य शब्द आणि वाक्प्रचार टाळा :

सामान्य शब्द किंवा वाक्ये वापरणे टाळा, कारण त्याचा अंदाज लावणे किंवा क्रॅक करणे सोपे आहे. उदाहरणार्थ, तुमच्या पासवर्डचा भाग म्हणून “पासवर्ड,” “admin,” किंवा “123456” सारखे शब्द वापरू नका.

जुना पासवर्ड पुन्हा वापरू नका :

वेगवेगळ्या अकाउंटसाठी एकच पासवर्ड पुन्हा पुन्हा वापरणे टाळले पाहिजे. जर एखाद्या सायबर गुन्हेगाराला तुमच्या अकौंटपैकी एका अकाउंटला प्रवेश मिळत असेल, बाकी अकाउंटमध्ये प्रवेश सहजी मिळू शकतो.

तुमचा पासवर्ड नियमितपणे बदला :

कमीतकमी दर तीन ते जास्तीतजास्त सहा महिन्यांनी पासवर्ड बदलण्याची गरज असते. हे खाते सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

टू-स्टेप व्हेरिफिकेशन :

टू-स्टेप व्हेरिफिकेशन ही पद्धत बँक खात्यात सेफ्टी लेव्हल अप करते. तुमच्या फोन किंवा ईमेलवर पाठवलेला कोड किंवा फिंगरप्रिंट किंवा चेहऱ्याची ओळख यांसारख्या बायोमेट्रिक घटकांचा समावेश ह्यात असू शकतो.

सतर्क रहा, आपली घामाची संपत्ती जपून ठेवा.

Related Articles

Type of Business Partner : व्यवसायातल्या भागीदाराची प्रकार

Type of Business Partner : 1932 च्या भारतीय भागीदारी कायद्यानुसार भारतात भागीदारी...

Upcoming IPOs in 2023 : भारतात 2023 मध्ये ‘हे’ IPO लाँच होऊ शकतात.

Upcoming IPOs in 2023 : मेनबोर्ड आणि SME या दोन्ही विभागांमध्ये 2023...

Important decisions of Nirmala Sitharaman : निर्मला सीतारामन ह्यांचे लोकप्रिय निर्णय.

Important decisions of Nirmala Sitharaman : 2019 सालापासून निर्मला सीतारामन ह्या भारताच्या...

12 Tips for Buying a New Car : नवीन कार घेताय? कोणती काळजी घ्याल?

12 Tips for Buying a New Car : पहिली गाडी घेताना खूप...