Secured Bank in India : अमेरिका तसेच युरोपमध्ये बँकिंग क्षेत्रावर मंदीचं सावट आहे. तेथील सिलिकॉन व्हॅली या बँकेसारख्या अनेक मोठ्या बँका मोडकळीस आल्या आहेत, तर काही मोठ्या व लहान बँका डुबण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रश्न पडतो की, अमेरिका सारख्या प्रगत राष्ट्रातील मोठ्या बँकांमध्ये सुद्धा पैसे सुरक्षित नाहीये, आपण तर भारतामध्ये राहतो. तसेच भारतातील बॅंकांमधला पैसा कितपत सुरक्षित आहे किंवा भारतातील बँकांची आर्थिक स्थिती कितपत मजबूत आहे? अशा देखील शंका आता सर्वसामान्यांच्या मनात घर करायला लागल्या आहेत. आता प्रश्नांचं उत्तर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) दिल आहे. रिझर्व्ह बँकेने भारतातील सर्वात सुरक्षित बँका (Secured Bank in India) कोणत्या याबद्दल माहिती दिली आहे.
भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणत्या?
आपल्या देशातील बँकिंग क्षेत्र खूप मोठं आहे. ह्यामध्ये सरकारी बँका (Government Banks), खाजगी बँका (Private Banks), लघु वित्त बँका (Small Finance Banks), सहकारी बँका (Co-operative Banks), ग्रामीण बँका (Rural Banks) आणि पेमेंट बँका (Payments Banks) या अशा अनेक प्रकारच्या बँका देशात अस्तित्वात आहेत. या सर्व बँकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचं काम आरबीआय करत असते. तसेच बँकेमध्ये असलेला सर्वसामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्याची जवाबदारी देखील भारतीय रिझर्व्ह बँकेची असते. त्यानुसार आरबीआयने आता सर्वात सुरक्षित बँका कोणत्या याची माहिती दिली आहे.
सर्वात सुरक्षित बँका :
आरबीआयने भारतातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली असून यात तीन मोठ्या बँकांचा समावेश आहे. तसेच या यादीत एका सरकारी बँकेचा तर २ खाजगी बँकांचा समावेश आहे. आरबीआयच्या मते, एसबीआय बँक (SBI), आयसीआयसीआय बँक (ICICI) आणि एचडीएफसी बँक (HDFC) या देशातील सर्वात सुरक्षित बँका आहेत. ह्यानुसार या बँकांचा D-SIB यादीत समावेश करण्यात आला आहे.
…तर रिझर्व्ह बँक करते मदत –
आपल्याकडील सर्वात सुरक्षित असणाऱ्या बँकांचा D-SIB यादीत समावेश केला जातो. अशा बँकांच्या पाठीमागे भारतीय रिझर्व्ह बँक भक्कमपणे उभी राहत असते. त्यामुळे या बँकांवर संकट आल्यावर रिझर्व्ह बँकेसह भारत सरकारही त्यांना साथ देत असते. तसेच फंडिंग मार्केटमधील काही अतिरिक्त सुविधाही या बँकांना मिळत असतात. ह्यामुळे ग्राहकांचा या बँकांवर अधिक विश्वास वाढण्यास मदत होते.