What is QR Code? : आपण रोज अशा काही गोष्टींचा वापर करतो की ज्याचा खरा अर्थच आपल्याला माहित नसतो.
आपल्याला वापरायची सवय असते म्हणून आपण त्याचा वापर करतो. अशीच एक गोष्ट आपल्या सर्वाचा अविभाज्य घटक बनला आहे. तो म्हणजे QR कोड.
आता बहुतांश व्यवहार हे QR कोड मार्फत होतात. कारण QR कोडने पैश्यांची देवाण घेवाण एका झटक्यात होते. QR कोडमध्ये बँकेची सर्व माहिती समाविष्ट केलेली असते.
त्यामुळे कोणत्याही पेमेंट अँप वरून QR कोड स्कॅन करून पैसे पाठवता येतात. हे सर्वांना माहिती आहे पण QR कोड नेमका काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का?
What is QR Code? QR कोड म्हणजे काय?
QR कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड (Quick Response Code). ही UPI किंवा पेमेंट अँपद्वारे ऑपरेट होणारी सेवा आहे,
जी मुख्यतो व्यावसायिकाला त्यांच्या ग्राहकांकडून पेमेंट प्राप्त करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात मदत करते.
व्यावसायिक मर्चंट पॅनल वापरून सहजपणे QR कोड तयार करू शकता, त्याची प्रिंटआउट तुमच्या स्टोअर किंवा आउटलेटवर प्रदर्शित करू शकता.
तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला फोनपे, गूगलपे, पेटीएम, भारतपे, यांसारख्या पेमेंट अँपद्वारे तुम्ही मर्चंट पॅनल वापरून QR कोड तयार करू शकता,
QR कोड व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरला आहे.
यामुळे व्यावसायिकांच्या विक्रीतही वाढ झाली आहे तसेच कॅशलेस व्यवहारांनाही QR कोडमुले प्रोत्साहन मिळाले आहे.